लढ पोरी लढ

सायली ढमढेरे(वडील शिक्षक) ही पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारी विद्यार्थीनी,  मुंबई येथे परीक्षा देऊन येताना रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी झाले, ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये परिस्थितीवर मात करत आहे व मनात स्पर्धा परीक्षा पास होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या लढवैय्या सायलीसाठी

👍🏻 *लढ पोरी लढ*💐

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

अनंत लाटांचा सामना करत
नौका गाठतेच ना सांग कड
गड यशाचा गाठायचाय तुला
पोरी मागे हटायचं नाही लढ

एका पावसात वाहून गेल्यावर
चिमणी बनवतेच पुन्हा घर
हरवू देऊ नकोस मनाला तू
इवल्याशा त्या वादळावर

यश संपादन केलेच तिने
जरी झाला होता अपघात
नाचे मयुरी अनमोल झाली
करीत परिस्थितीवर मात

आई बाबा आणि मिञपरीवार
आहेत तुझ्या सोबती नेहमी
हरणार नाहीस तु मनात कधी
फक्त हीच आम्हाला हवी हमी

विसरायचे आहे सारे दुःख
पुन्हा जोमाने लढण्यासाठी
घेयचीय तुला उतुंग झेप
अवकाशाला जिंकण्यासाठी

लढायची तयारी ठेव तु फक्त
बघ सारं आसमंत खुणवतयं
यशाचे शिखर तुच चढावस
जणु तुलाच तेही विणवतयं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा,पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बालकविता

*बालकविता*

*प्राण्यांची ओळख मांजर*

मँव मँव करते
वाघाची मावशी
कामाला माञ
हाय लय आळशी

एक तीची सवय
आहे खूप छान
लपवून टाकते
स्वतःची घाण

तिला आवडते
पियाला दुध
झाकते डोळे
नसते सूद

मराठीत मांजर
इंग्रजीत कँट
आवडते तीला
खायला रँट

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तीच ती

*तीच ती*

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

वेलींच्या पानात
भ्रमरांच्या गाण्यात
सुंदर फुलात
फुलांच्या गंधात
तीच *ती*

सनईच्या सुरात
गाण्यातील शब्दांत
गझलेतील माञेत
कवितेतील ओळीत
तीच *ती*

प्रत्येक थेंबात
वाहणाऱ्या झर्यात
झुळझुळ पाण्यात
खळखळणार्या ओढ्यात
तीच *ती*

काळसर नभात
चांदेरी प्रकाशात
वाहणाऱ्या वार्यात
मंद मंद तारकात
तीच *ती*

माझ्या मनात
मखमली पानात
सळसळणार्या रक्तात
मनातल्या कप्प्यात
तीच *ती*

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

थांबायच नाही आता गड्या

*चलो औरंगाबाद १५ अॉक्टोंबर*
*थांबायच नाही आता गड्या*
थांबायच नाही आता गड्या
पुढतीच आहे तुला जायचे
हक्क मिळाल्याबिना आपुला
मागे कधीच नाही परतायचे
घेण्या ती पेन्शन हिसकावून
संघटित आपण चला होऊ
जे आले, लढले आणि संपले
न्याय त्यांनाही मिळवून देऊ
स्वार्थी राजकारणी आनंदात
मिळवून घेतली की हो पेन्शन
आम्ही राबराब राबतो जन्मभर
घेऊन उतार वयातील टेंन्शन
म्हणूनच सांगण तुला जागा हो
जुन्या पेन्शनचा आता धागा हो
मिळविण्या आपला हक्क आपण
झटकून कामाला आता लागा हो
नागपूर असो वा आझाद मैदान
ही तर फक्त झाँकी आहे
यश खूप दूर नाही रे आपुल्या
एकच एल्गार आता बाकी आहे
✍🏻 *लक्ष्मण द. सावंत*
*प्रा.शि.औरंगाबाद*
*एक डी.सी.पी.एस.ग्रस्त*

सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या

*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*🍀
सीमा ओलांडा रे मानवतेच्या
आणिक ओलांडा समतेच्या
नाव कमवण्या जीवनात या
सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या
बळी जाते *ती* बलात्काराच्या
वाढल्या घटना बहु दुष्कर्माच्या
छाटा चला रे मुंडकी रावणाच्या
*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*
शहीद जवान रक्षणा सीमेच्या
शेतकरी ही प्रतिक्षेत भावाच्या
नेते लुटत्यात तिजोरी देशाच्या
नको जावू आहारी भावनेच्या
दीनांचा कैवारी आता तु व्हावे
उज्वल भारताचे स्वप्न दाखवावे
संगती नको आता दुर्जणाच्या
*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*
उद्याची पहाट रे तुझ्याचसाठी
आणि दीनांच्या कल्याणासाठी
माझ्याही आहेत पाठी शुभेच्छा
*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल.औरंगाबाद*

मंगलमयी दिवाळी आली

💥 *मंगलमयी दिवाळी आली*🎊
✍🏻 *श्री.लक्ष्मण द.सावंत*
मंगलमयी दिवाळी आली
ज्ञान प्रकाशाचे दिवे लावा
ज्ञान सुगंध पसरवेल जगी
असे तोरण दाराला लावा
दुष्ट जळमटे घराची काढा
प्रेमाचे रंग तयाला लावा
रागरोष जुने विसरून ते
मांगल्याचा पेटवा दिवा
प्रात; समयी लवकर उठूनी
आळस मनातून फेकून द्या
अत्तर सुगंधी उटने लावूनी
ताईच्या हाताने न्हावून घ्या
संस्काराची रांगोळी दारात
गोड फराळाची चव पाहा
थोडस तिखटही हवेच न
धपाटे चिवडाही मजेत खा
दिवाळी सन खरचय मोठा
आनंदालाही नाहीय तोटा
आपल्यासवे अनाथांच्याही
दोन-चार घास भरवू पोटा
दिवाळी कधीच निरस नाही
आपणच निरस होत चाललो
वास्तवाला विसरत जाऊन
मोहजालाला पाहून भुललो
✍🏻 *श्री.लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
📱 *9403682125*

फटाके वाजवणे टाळा

आजच्या औरंगाबाद येथील आग्नितांडव व फटाक्यामुळे झालेले नुकसान खूपच भयानक होते..शाळेला सुट्टी लागताना आम्ही सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रदुषणमुक्त व फटाकेमुक्त दिवाळी पथनाट्य सादर केलेले किती समर्पक होते याचा प्रत्यय आला.म्हणुनच आजचे हे काव्य* 👇🏻
आनंदात विरजण हे
आज पडले काहीसे
आताच कसे होत्याचे
झाले क्षणात नाहीसे
क्षणाची ती रोषणाई
काय सांगा कामाची
वाहून कष्टे जाणार
माती मोल घामाची
असे हे अग्नितांडव
सुखी स्वप्न बेचिराख
पैसाचा चुराडा झाला
मालमत्ता इथं खाक
किती पक्षी जायबंदी
किती किती प्रदुषण
कोण सांगणार किती
झाले असेल नुकसान
सावध व्हा आतातरी
ऐका पुढल्या हाका
प्रदुषण करणाऱ्याला
चला आतातरी रोखा
म्हणुनच प्रदुषणावर
घातला पाहीजे आळा
का ओढवाता संकटे
फटाके वाजवणे टाळा
🙏🏻फटाके वाजविणे टाळा 🙏🏻
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

दिवा ज्ञानाचा

*सर्व शिक्षक बंधु- भगिनींना समर्पित*
🌹 *काव्यांजलि* 🌹
💥 *दिवा ज्ञानाचा* 💥
✍🏻 *लक्ष्मण द. सावंत*
लावला दिवा, दिवा ज्ञानाचा प्रकाशला
अज्ञानरूपी अंधकार, कायमचा संपला
ज्ञानरचनावाद ,साथीला सदैव आमुच्या
तंत्रज्ञानालाही ज्ञान माळेत आहे गुंपला
विचार मनात एक,प्रगत महाराष्ट्र माझा
शिक्षक बंधु म्हणुनच या कामात गुंपला
लोकवर्गीनीने शाळा, डिजीटल झाल्या
स्वखर्च करण्यासही जीव कधी न कंपला
वाटते चिमुकल्यांनी या, बहूआयमी बनावे
त्याच्यातच शिक्षक हा नित्य आहे जुंपला
आदेश नको आम्हा, प्रेमळ साद माञ हवी
कारवाईचा तुम्ही, झाकून टाका ना शिंपला
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद

एन्काउंटर

म.प्र.मध्ये जेलमधुन पळालेल्या दहशतवाद्यानां इन्काऊंटरमध्ये कंठस्नान घालणाऱ्या पोलीस जवानांना सलाम*
🔫 *इन्काऊंटर*🔫
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
*इन्काऊंटर झालाच पाहिजे...*
नाबालीग कळीवर बलात्कार
करणाऱ्या हातांचा,
आणिक त्यांच्यावर वाईट नजर
ठेवणार्या डोळ्यांचा
*इन्काऊंटर झालाच पाहिजे...*
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या
राजकारणी सैतानांचा,
भ्रष्टाचाराला पोषणार्या
बेअक्कल शासनकर्त्यांचा
*इंन्काऊंटर झालाच पाहिजे....*
पारंपार चालत आलेल्या
पारंपरिक रूढींचा
आणिक जाती-जातीत
विभागलेल्या समाजव्यवस्थेचा
*इंन्काऊंटर झालाच पाहिजे....*
स्वतंत्र्य प्राप्तिनंतरही
भासणार्या गरीबीचा,
गावागावात न पोहोचलेल्या
अनेक सुखसुविधांचा
*इंन्काऊटर झालाच पाहिजे....*
देश सीमेला आतुन-बाहेरून
पोखरणार्या दहशतवादाचा
आणिक याला खतपाणी
घालणाऱ्या देशद्रोहींचा
*इंन्काऊंटर झालाच पाहिजे...*
बुरसटलेल्या, मागासलेल्या
विचारांचा
अविवेकी,भावनाशुन्य
मनाचा
*इंन्काऊंटर झालाच पाहिजे...*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

साळू

🌹 *काव्यांजलि* 🌹
👩🏽 *व्यक्तीरेखा-साळू*👼🏼
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
साळू एक गोंडस मुलगी
खुदकन गालात हसायची
रंग तिचा तेजस्वी सावळा
पोलक्यामधीच दिसायची
आई-बाबा दुष्काळात गेले
आजीसोबत ती रहायची
मोडक्या त्या झोपडीमधुन
भविष्याची स्वप्न पहायची
दोन वेळच्या जेवणासाठी
साळू मोल-मजुरी करायची
शिक्षण हेच वाघिणीचं दुध
कधीच ना ती विसरायची
अंधाराची भिती कधी नाही
त्याचीच तीला सोबती होता
विजेचा बल्ब कुठं नशीबात
कंधीलातच अभ्यास होता
कित्येक संकटांना तिने होते
जीवनात लिलया पार केले
यातुनच तीला कसे जगायचे
याचे बळ कि हो मिळून गेले
संकटांवर मात करीत असता
लोकसेवा परीक्षा पास झाली
झोपडीतील ती कष्टाळू साळू
लालदिव्याची मानकरी झाली
अशाच प्रकारे प्रत्येक साळूने
स्वतःला सज्ज केलेच पाहिजे
परिस्थितीवर मात करायला
स्वतःच आता शिकले पाहिजे
स्वतःच आता शिकले पाहिजे
*परिस्थितीवर मात करीत शिक्षण पुर्ण करून यशस्वी होणाऱ्या प्रत्येक साळूसाठी समर्पित*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

दिवाळी सुट्या संपल्या

औरंगाबाद जिल्ह्यात दि.०९/११/२०१६ पासून दिवाळी सुट्टी नंतर शाळा सुरू होत आहेत , इतर जिल्ह्यातही या अथवा पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहेत..आणि शिक्षक बंधुंना सुट्टी नंतर प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करायची आहे.त्यानिमित्ताने*
🏃🏻 *दिवाळी सुट्या संपल्या* 🏃🏻
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
चला शिक्षक मिञांनो
चला वाट शाळेची धरू
संपल्या दिवाळी सुट्या
शाळेचाच विचार सुरू
इवलेशी ती मुले शाळेत
आपुल्या आधी येथील
दिवाळीच्या सर्व गमती
एकमेकांना सांगतील
आपल्यालाही ते विश्व
समजून घ्यावेच लागेल
दिसभर मस्तीत त्यांच्या
सामील व्हावेच लागेल
विचारा त्यांना दिवाळीत
फराळ संपवला कीती
फटाक्यांची कोणकोणा
वाटलेली होती भीती
दिवाळीत जरी आपण
थोडे सुस्तावले असु
बनविले किती किल्ले
जरा विद्यार्थ्यांना पूसु
पहिला दिस तरी फक्त
तुम्ही द्या विद्यार्थ्यांसाठी
अॉनलाईन, टपालाच्या
मग कशाला हव्या अटी
प्रगत व्हावाच महाराष्ट्र
हीच मनात आहे इच्छा
पहिल्या दिवसासाठी
मनापासून शुभेच्छा
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
📱 *९४०३६८२१२५*

नाठाळाच्या माथी काठी

👊🏻 *नाठाळाच्या माथी काठी* 👊🏻
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
निर्णय असा अचूक
लक्ष्यभेदी धरला
काळापैसावाला त्याने
जाग्यावरच मारला
मंञीमंडळ,अधिकारी
गुपित माहिती नसते
आर्थिक सर्जीकल
असे आरपार घुसते
प्रहार असा जबर की
एक घाव दोन तुकडं
माल पांढरा करण्या
सैरभैर काळी माकडं
आत्ता कुठं विकासाचा
इथं येणार आहे पूर
मोदीजींनी या देशाचा
बदलविला आहे नूर
असेच निर्णय असु दे
जनता आहेच पाठी
तुकोबा वदे नाठाळाच्या
माथी हाणुयात काठी
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
📱 *९४०३६८२१२५*
*hindhsher99@gmail.com*

चौफेर

🏇🏿 *चौफेर* 💰
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
धावतो अश्व अविचारी
जाणिवाने यातना
सफरीची येते मजा मग
कोण जाणतो भावना
जगातील घडामोडींचा
असर शेतकऱ्यांवर होतो
नोट बंदीचा फटकाही
त्यालाच जाऊन मिळतो
काळ्याधनाच्या कोळस्यात
मानवता जरी हरवते
शांताबाईच्या रूपाने तारका
या भुतलावर चमकते
नोटा धडवून ठेवण्याचा
जडला होता आजार
नोट बंधीनंतर वापरताना
होतील पाहा ते बेजार
खाल्लं मीठ या मातीचं
कधी विसरू नका
मीठाबद्दल तरी अफवा
तुम्ही पसरवू नका
लोकशाहीची मान ताट
तुमच्यामुळेच होईल
काळ्याधनाची कृष्णकृत्ये
मातीत मिळली जाईल
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*Email-hindhsher99@gmail.c

नोटसम्राट

💴 *नोटसम्राट* 💴
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
जमा करावं की न करावं
हा एकच प्रश्न....
की जगावं होऊन लाचार
घेऊन शंभर उसनं...
पाच पिढ्या बसून खातील
एवढी जमवली माया...
मातीमोल झालय आज
समदचं गेलं वाया...
का आताच विधात्यानं बर
एवढं कठोर वागावं....
क्षणार्धात एका सुंदर बागेचं
राखेत रूपांतर व्हावं....
काळाधनरूपी कर्कानं
मारला असा डंक..
एकाच राञीत रावाचा
होऊन बसलो रंक..
माझी अमाप होती संपत्ती
नव्हते काहीच कमी...
कशी करावी ती बँकेत जमा
सुचेना युक्ती नामी...
या पाचशे हजारांच्या नोटांचा
आता शेवट करावा...
की बँकेत जमा करून माया
दंड तिजोरीत भरावा...
काळापैसा सापडून आता
जेलशी होईल गाठ...
विसरून माणुसकी मी
झालतो *नोटसम्राट*....
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com

बालपणच गारठतय

*चार भिंतीत जग असणाऱ्या बालकाची बालदिनानिमित्त आईकडे मांडलेली व्यथा*
*बालपणच गारठतय*
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
तोच तो इडीयट बॉक्स
कार्टुन्स रटाळवाणी
चार भिंतीत माझ जग
खेळाया नाही कोणी
कधी लागेल अंगा माती
अन् बनवेल बैलजोडी
कार्टुन्स शिवायही माझे
असतील ना सवंगडी?
मलाही आई फूलपाखरांसवे
स्वच्छंद मुक्त जगायचय
मास्यांचे कल्ले लावून अंगा
पाण्यात खोल डुबायचय
किती जगू अभासी दुनियेत
शिरू दे कानात वारा
चिञात नको प्रत्यक्षातही
पाहू दे मोराचा पिसारा
तुच सांग शहाणं बाळ मी
होऊन जगू किती?
पिंजऱ्यातील जीवन माझं
बालपणाची झाली माती
संपलय ग समदं माझं
खेळण मनसोक्त
हसणं मनापासून आई
कधीच झालय लुप्त
सुटकेसाठी दावणीचं बघ
बछडं कस ओरडतय
सांगू कस आई चार भिंतीत
*बालपणच गारठतय*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com

केलाय का मी गुन्हा

*केलाय का मी गुन्हा*?🤔

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

सुखाच्या या बागेमधी
कळी म्हणून मिरवत होते
खुडले गेले फूल होताच
फुलपाखरांना झुरवत होते
फूल होऊन जगण्याचा केलाय का मी गुन्हा?

झुळझुळ गाणी गात
झरा म्हणून वाहत होते
मलीन झाले नदी होताच
डोंगरदरीत खेळत होते
नदी होऊन वाहण्याचा केलाय का मी गुन्हा?

बालपण बाहुलीवाणी
राजकुमारीच भासत होते
वाईट नजरा सज्ञान होताच
आनंदाने मी राहत होते
मुलगी होऊन जगण्याचा केलाय का मी गुन्हा?

निरागस मन लहानपणी
खरेखोटे ओळखत नव्हते
पदोपदी स्वार्थीपणा मोठे होताच
लहानपण निर्मळ होते
मोठे होऊन जगण्याचा केलाय का मी गुन्हा?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

लेक माझी

👧 *अष्टाक्षरी-लेक माझी*👧

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

इवलीशी लेक माझी
आहे जणू माझी आई
छोट्या छोट्या गरजांची
ती काळजी माझी घेई

इवलीशी लेक माझी
जणू आनंदाची खाण
कुठे भटकणार मी?
तिच्यातच माझे प्राण

इवलीशी लेक माझी
माझ्या अंगणी खेळते
फुलावर चिमुकले
फुलपाखरू भासते

इवलीशी लेक माझी
अशी लुटूलुटू धावे
विसरून देह भान
वाटे पाहत राहावे

इवलीशी लेक माझी
नकोच सासरी जाया
नाही लागणार वेळ
डोळ्यात पाणी यावया

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*

कुठं आहे लोकपाल?

*कुठं आहे लोकपाल?*

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

कुणी झाला मुख्यमंत्री
कुणी झाले राज्यपाल
लढा राहिला अधुराच
सांगा कुठंय लोकपाल?

देशात क्रांती करण्याचा
विचार आण्णाला आला
सत्तरीतला हा युवक मग
लढण्यास सज्ज जाहला

वाटले होते लोकपालाने
देशात बदल घडून येईल
भ्रष्टाचार या मायभुमीतून
कायमचाच संपून जाईल

आण्णालाच नाही कळले
की चक्र असे कसे फिरले
हात धुतले प्रत्येकाने यात
मागे कोणीच नाही उरले

रखडलाय लोकपाल म्हणे
विरोधी पक्षनेत्या विना
भरडली जनता भ्रष्टाचाराने
आहे का सांगा पर्वा कुणा?

जंतरमंतर मैदानही आता
विचारू लागलय सवाल
खुप डुमडौलात नटलेलं
कुठं आहे ते लोकपाल?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*

पोशिंद्याची व्यथा

*पोशिंद्याची व्यथा*

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

आडत बाजारामधी
जाणवत आहे मंदी
भविष्यातील असेल
का ती उद्रेकाची नांदी

नोटा बंदीपासून आहे
शेतातील माल पडून
गळालेत पाय सुकलाय
पोशिंद्याचा गळा रडून

प्रत्येक हवामानात का
त्यालाच मार बसतोय?
तक्रार करणार कुणाकडं
मुकाट्याने सारे सोसतोय

लेकरावानी जपलेला सारा
माल लागलाय सडायला
तीळतीळ तुटतय काळीज
येतयं हमसून रडायला

अशा वेळी पोशिंद्याची
मदत करायलाच हवी
थोड्याशा आधारानेही
तो घेईल उभारी नवी

होणार आहे बदल म्हणून
तो ही विनाअट सोसणार
दगडानेच ठेच दिली तर
कोणत्या दगडाला कोसणार?

थोड्याशा मागणीसाठी
सारी दुनिया करते संप
शेतकरी संपावर गेला तर?
होईल अघटित धरणीकंप

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*

निरागसतेचा झालाय खून

🔪 *निरागसतेचा झालाय खून*

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

वाहून गेलय चिऊच घर
राहील्या फक्त आठवणी
शुष्क झाल्या बालगप्पा
हरवल्यात बडबडगाणी

वाढलय इथं कॉंक्रेटजंगल
संपलेत सारे मैदानी खेळ
प्राणवायुसाठी झाडानांही
हात पसरायची आली वेळ

मनातुन हसत नाही कोणी
सगळेच झालेत अॉनलाईन
उसणे हासु चेहऱ्यावरती
अन् बोलणं आय ॲम फाईन

तंत्रज्ञानाने जरी जग समदे
एकमेकांजवळ आलं
निरखून पाहा खरेतर सगळं
मनाने खुपच दुरावलं

आईचा तो भाऊ चांदोमामा
झालाय म्हणे आता मून
सुधारल्याच्या नावाखाली
निरागसतेचा झालाय खून

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*

गळाभेट

🏟 *गळाभेट*🔗

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तुरूंगालाही म्हणे
पाझर आज फुटला
कैद्यांनीही मायेचा
ओलावा इथं लुटला

नको फक्त कारावास
हवा सुधारण्या वाव
मिळु द्या किनार्याला
डुंबण्या आधी नाव

झाली आपल्यांची भेट
किती आनंद वाटला
वाळवंटात मायेचा आज
कोमल अंकुर फुटला

बायका मुलांची यांच्या
म्हणे गळाभेट केली
डोळ्यांबरोबर तयांची
ह्रुदयही ओली झाली

झाल नसतं कृष्णकृत्य
तर आज इथं नसतो
सडलो नसतो तुरूंगात
घरी आनंदात असतो

हक्क पुन्हा सुधारण्याचा
प्रत्येकालाच आहे
म्हणूनच गळाभेटीचे इथं
प्रयोजन केलं आहे

आपराधी जरी असेल तो
तरी रक्ताच नात
भेटावया तयाला लेकीच
मन जेलात धावत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*ldsawant.blogspot.in*

तुला सोडून येताना

😢 *तुला सोडून येताना*😢

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तुला सोडून येताना
काळोखल्या होत्या दिशा
चांदण्यांची साथ जरी
एकांताने रडत होती निशा   

तुला सोडून येताना
होतो बेवफा मी जाहलो
किनाऱ्याला भुलूनी
निरर्थक वाहतच राहिलो  

तुला सोडून येताना
रवीही रडला होता
तुला नको दाह म्हणून
क्षितीजात दडला होता

तुला सोडून येताना
मला होते काटे बोचत
तुला मिळावा गुलाब
म्हणून होतो हसून सोसत

तुला सोडून येताना
होता थरारला हात
पडलं भोक काळजात
कसं वर्णु मी शब्दात

तुला सोडून येताना
आठवत आहे ती रात
आणाभाका खाल्लेल्या
तुला देणार होतो साथ

तुला सोडून येताना
वाटलं नव्यानं मी जगेण
नव्हतं वाटलं तुजविना
क्षणा क्षणाला मी मरेण

✍🏻  *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©hindhsher99@gmail.com*

अपघात

*रेल्वे अपघातावरून प्रभावित*

*अपघात*

✍🏻  *लक्ष्मण द.सावंत*

काळराञ म्हणावी
की काळी पहाट
एक तडा रूळाला
यमसदनाची वाट

कसा म्हणावं यास
सांगा अपघात
साखरझोपेत जणू
झाला हो घात

किती होती स्वप्ने
निजल्या डोळ्यात
छाटली ती कळी
फुलायच्या आत

रस्ता काय रेल्वेरूळ
वेळेवर करा दुरूस्त
नकोच ती टाळाटाळ
सरकार निद्रेत सुस्त

काटा रूतला माझ्या
काळजात खोल
जीव जीवाचा तुटला
मदत मातीमोल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

तु अशी

🌹 🌹

✍🏻 लक्ष्मण द.सावंत

मखमली केस तव
उडत्याती वार्यावर
अडकला हा जीव
चित्त नाही थार्यावर

हस ना जरा गाली
कळी कळी अतुर
सुगंध चहू बाजूला
झाल्या की फितुर

पायातलं ते पैजण
रूणझुण वाजती
मोरनी नाकातली
मजला खुणावती

चंद्राची ती चकोर
भाळी तव सजली
हळूच हसते गाली
सांग कुणा लाजली

नकोस राहू दूर अशी
मज पाशी तु हवी
नजरेत माझ्या तुझी
भरली आहे छवी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
hindhsher99@gmail.com

त्याला फक्त शिकवू द्या

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

पहिले कसा गुरूजींकडे
वेळच वेळ असायचा
दिसभर विद्यार्थ्यांबरोबर
तो रमताना दिसायचा

गमतीजमती शिकवताना
तो ही प्रसन्न असायचा
अशैक्षणिक कामाचा तेव्हा
अंगावर बोजा नसायचा

आता सरल शालार्थानी
त्याला पुरतं वेडलय
प्रगत माझ्या महाराष्ट्रात
अस भयानक घडलय

पेन्शन नाही, पगारामुळेही
घरात वाढू लागले खटके
तरूणपणातच गुरूजींना
आता येऊ लागले झटके

सेल्फी, अॉनलाईन कामात
गुरूजी झालेत दंग
रेंज शोधताना जीवनातील
उडून चाललेत रंग

विविध योजनांचा ढिगारा
अन् वाहू लागतोय पूर
अमलबजावणीत वेळ जातो
शिकवणे राहतय दूर

गुरूजी आहे ज्ञानदाता त्याला
गुरूजीच म्हणून राहू द्या
होईल कल्याण गरीब मुलांचे
त्याला फक्त शिकवू द्या
🙏🏻त्याला फक्त शिकवू द्या🙏🏻

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.केँ.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

ती मध्यराञ

जरा डोकावून पाहिल तर
एकही दंगल घडली नाही
जाळपोळ तर सोडनच द्या
एकही गाडी फोडली नाही

काळा पैसा हाच एकमेव
याच्या मागच कारण आहे
काळ्यापैसावाल्यांची आता
पाचा-वरती धारण आहे

संसदेत जरी गोंधळ झाला
सगळा देश रांगेमधी आहे
काळा पैसा स्वर्ग जरी
काट्यांची ती गादी आहे

इनामदारीने नित्य राहणारे 
झाले आहेत मनातून खूष
देशहीताला पोखरलेली ती
अचुक मारलेली आहे घुस

निर्णायाची ती मध्यराञही
मनातून सुखावली असेल
स्वतंत्र भारतात आता तरी
सामान्य जन आतुन हसेल

जरा सोसून पाहिले तर

✍🏻  लक्ष्मण द.सावंत

निर्णय खरच छान आहे
जरा सोसून पाहिलं तर
काळोखात हरवलो असतो
असचं राहिलं असत तर

होत आहेत कष्ट जरी
उज्वल आहे भवितव्य
नकोच जायला बळी
पुन्हा एकदा एकलव्य

रांगेत उभे राहायची ही
सवय खरेतर नवी नाही
आत्ताच रांग मोडायची
का बरे लागलीय घाई?

सामान्य माणूस खूष आहे
नक्कीच बदल घडत आहे
काळ्याधनावरील नागोबा
सतत वळवळ करत आहे

संघर्षाशिवाय नाही भविष्य
इतिहास बघा सांगत आहे
नव्या दिशेनं घ्या चला झेप
संगत तुमची मागत आहे

गेलेत जरी बळी पन्नास
या लढाईत शहीद झाले
धनदांडग्यांना नाही वाली
दाबे चांगलेच दणाणले

नोटाबंदिला आपण सर्व
हसत हसत सामोरे जाऊ
एक भारत सशक्त भारत
हेच ब्रिद डोळ्याम्होरं ठेवू

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*