लेक माझी

👧 *अष्टाक्षरी-लेक माझी*👧

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

इवलीशी लेक माझी
आहे जणू माझी आई
छोट्या छोट्या गरजांची
ती काळजी माझी घेई

इवलीशी लेक माझी
जणू आनंदाची खाण
कुठे भटकणार मी?
तिच्यातच माझे प्राण

इवलीशी लेक माझी
माझ्या अंगणी खेळते
फुलावर चिमुकले
फुलपाखरू भासते

इवलीशी लेक माझी
अशी लुटूलुटू धावे
विसरून देह भान
वाटे पाहत राहावे

इवलीशी लेक माझी
नकोच सासरी जाया
नाही लागणार वेळ
डोळ्यात पाणी यावया

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*

No comments: