त्याला फक्त शिकवू द्या

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

पहिले कसा गुरूजींकडे
वेळच वेळ असायचा
दिसभर विद्यार्थ्यांबरोबर
तो रमताना दिसायचा

गमतीजमती शिकवताना
तो ही प्रसन्न असायचा
अशैक्षणिक कामाचा तेव्हा
अंगावर बोजा नसायचा

आता सरल शालार्थानी
त्याला पुरतं वेडलय
प्रगत माझ्या महाराष्ट्रात
अस भयानक घडलय

पेन्शन नाही, पगारामुळेही
घरात वाढू लागले खटके
तरूणपणातच गुरूजींना
आता येऊ लागले झटके

सेल्फी, अॉनलाईन कामात
गुरूजी झालेत दंग
रेंज शोधताना जीवनातील
उडून चाललेत रंग

विविध योजनांचा ढिगारा
अन् वाहू लागतोय पूर
अमलबजावणीत वेळ जातो
शिकवणे राहतय दूर

गुरूजी आहे ज्ञानदाता त्याला
गुरूजीच म्हणून राहू द्या
होईल कल्याण गरीब मुलांचे
त्याला फक्त शिकवू द्या
🙏🏻त्याला फक्त शिकवू द्या🙏🏻

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.केँ.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

No comments: