केलाय का मी गुन्हा

*केलाय का मी गुन्हा*?🤔

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

सुखाच्या या बागेमधी
कळी म्हणून मिरवत होते
खुडले गेले फूल होताच
फुलपाखरांना झुरवत होते
फूल होऊन जगण्याचा केलाय का मी गुन्हा?

झुळझुळ गाणी गात
झरा म्हणून वाहत होते
मलीन झाले नदी होताच
डोंगरदरीत खेळत होते
नदी होऊन वाहण्याचा केलाय का मी गुन्हा?

बालपण बाहुलीवाणी
राजकुमारीच भासत होते
वाईट नजरा सज्ञान होताच
आनंदाने मी राहत होते
मुलगी होऊन जगण्याचा केलाय का मी गुन्हा?

निरागस मन लहानपणी
खरेखोटे ओळखत नव्हते
पदोपदी स्वार्थीपणा मोठे होताच
लहानपण निर्मळ होते
मोठे होऊन जगण्याचा केलाय का मी गुन्हा?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: