🌹 *छंद तिला अनोखा*
उडती वार्यावर केस मखमली
बटाही करती चाळे मऊ गाली
छळतो तो नाद रेशमी केसांचा
तिला छंद ना बटा आवरण्याचा
नजरेत सामावू पाहता लपून बसते
शोधताना तिला कधी ना सापडते
चंद्राचा तुकडा ढगाआड लपायचा
तिला छंदच नेहमीच हरवण्याचा
तिच्या एका नजरेने घायाळ होतो
मी माझ्यातुनच नाहीसा होतो
नाद मला तिच्या नजरेत सामावण्या
तिला छंद नेहमी नजरा चोरण्याचा
शब्द जसे माझ्या कानावर पडती
कर्णपटले ऐकण्या ते अतुर असती
नाद मज शब्दजळात अडकण्याचा
तिला छंद शब्दांनी भुलवण्याचा
मजला ती फुलपाखरू भासते
मी धरू पाहता दूर ती पळते
नाद मलाही तीलाच धरण्याचा
तिला छंद तो निसटून जाण्याचा 😥
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*