*कुठं आहे लोकपाल?*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
कुणी झाला मुख्यमंत्री
कुणी झाले राज्यपाल
लढा राहिला अधुराच
सांगा कुठंय लोकपाल?
देशात क्रांती करण्याचा
विचार आण्णाला आला
सत्तरीतला हा युवक मग
लढण्यास सज्ज जाहला
वाटले होते लोकपालाने
देशात बदल घडून येईल
भ्रष्टाचार या मायभुमीतून
कायमचाच संपून जाईल
आण्णालाच नाही कळले
की चक्र असे कसे फिरले
हात धुतले प्रत्येकाने यात
मागे कोणीच नाही उरले
रखडलाय लोकपाल म्हणे
विरोधी पक्षनेत्या विना
भरडली जनता भ्रष्टाचाराने
आहे का सांगा पर्वा कुणा?
जंतरमंतर मैदानही आता
विचारू लागलय सवाल
खुप डुमडौलात नटलेलं
कुठं आहे ते लोकपाल?
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*