💸 *नियोजनशुन्य*💸
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
नोटाबंदीनंतर आनंदल
आता खच खातय मन
निर्णय खरच क्रांतिकारी
पण नव्हतेच नियोजन
खरच बसलाय का धक्का
काळ्या पैसावाल्यांना?
तोंड दाबून बुक्यांचा मार
कोणीच काही बोलेना
पांढरेच पैसे सारे आमचे
बँकेत बसलेत अडकून
गेलेत हात पाय गळून
सतत ऐटीममधे धडकून
असून अडचण नसून खोळंबा
झाली दोन हजाराची नोट
खिशात असून पैसे सुद्धा
उपाशीच राहतय पोट
सुट्टे कुठेच मिळत नाही
वाढायला लागली दाढी
बायकोच वेगळच दुखण
मिळेल का तिला साडी 😥
दळणाबरोबरच किडाही
लागलाय भरडला जाऊ
पोटाला मिळाना खायला
देश डिजीटल होतोय पाहू
होतोय जरी ञास तरी
खुशीतच आहे जनता
सोसलं अजून थोड तर
देश होईनच महासत्ता
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*