यशवंत हो

यशवंत हो तु बुद्धीमंत हो
दूर करावया अंधार तु
                 ...........ज्ञानवंत हो||धृ||

अपार मेहनत कष्ट तु, वेचले दिनरात
अंधार संपवून यशाची उगवेल प्रभात
नकल नको करू होईल तुझाच घात
नकोस शोधू शॉर्टकट तु प्रतिभावंत हो||१||

दूर अजून ध्येय तुझी दूर अजूनी यश
मन कर खंबीर जाईल दूर ते अपयश
नकोच आता द्विविदा तु प्रसन्नतेने हस
हिमतींने मार्गक्रम कर तु कित्तीवंत हो||२||

माता पिता गुरूजी तुझ्या पाठीशी सदैव
परिश्रम कर अपार नसते कधीच रे दैव
नको कॉपी दुसऱ्याची विश्वास स्वतःवर ठेव
तेजाळून ज्योत अंतरीची तु गुणवंत हो||३||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
कृपया आवडल्यास नावासह शेअर करा🙏🏻

महिला दिन विशेष

*महिला दिन विशेष*

तुच कन्या तुच माझी बहीण
तुच सखी तुच माझी माय ग
उणे होताच तु आयुष्यातुनी
उरणारय सांग मग  काय ग

तुझाच स्पर्श जाहला मजला
कुशीत घेता मी जन्म तुझ्या
थेंब अमृताचे मी तव प्राशिलो
मिळत गेली मज नित्य उर्जा
सदा घडो तव चरणांची सेवा
अजूनी मागणे काहीच नाय ग

बहीण तु माझ्या पाठीवरची
मलाच तरी तु समजून घ्यायची
उब मायेची तुझ्यात मिळायची
अपराध माझे पोटात गिळायची
आनंदी जरी सासरी तुझ्या तू
लागोत माहेरीही तुझे  पाय ग

माझ्या आयुष्यभराची तु साथी
दिव्याबरोबर जशी जळते वाती
घट्ट बांधलेत तु सर्वांशीच नाती
उमलत ठेवलीस आपली प्रिती
तुच फुलांची ती ओंजळ माझी
नित्य सुगंध दरवळत  जाय ग

इवल्या पावलांनी तु आली घरी
भासे  जणू  अवकाशातील परी
वर्णु किती आनंद तो माझ्या उरी
लेक माझी लाडाची सर्वांची प्यारी
धावते अंगणात दुडूदुडू अशी की
तुझ्याविना घराला शोभाच नाय ग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तु माझी

🌹 *तु माझी*🌹

तु रोज बोलावस
असही काही नाही
तु रोज हसुन पहावं
असही काही नाही
तु माझीच आहेस
हेच काही कमी नाही

तु नित्य प्रतिसाद द्यावा
अस काही नाही
तुही l love u बोलावं
असही काही नाही
रोज नजरानजर होते
हेही काही कमी नाही

गुंपून हातामंधी हात
जावं दूरवर किनारी
उशीराच परतावं घरी
असही काही नाही
माझ्याच विचारात रमतेस
हेही काही कमी नाही

तव गाण्यात मी असावं
असही काही नाही
तु नेहमीच सुंदर दिसावं
असही काही नाही
मी आठवता तु हसावं
हेही काही कमी नाही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*