*जगण्याचे बळ*
सोसवेना आता या
तिव्र उन्हाची झळ
विहिरींनीही केव्हाच
गाठलाय तो तळ
पर्ण झडून वृक्षवेली
बोडक्या झाल्यात
पाण्याविना पडल्या
धरतीलाही भेगळ
पाणवटे केव्हाचेच
पडलेत सारे ओस
प्राणी सैरावैरा झाले
शोधताना मृगजळ
सुकल्यात पापण्याही
सुकताना पिके मोती
जखम काळजामध्ये
कसे दाखवणार वळ
आस कर्जमाफीची
या मनाला लागलीय
तरी मायबाप सरकार
अजूनही काढतय पळ
इडापिडा टळू दे सारी
येवो दे बळीचे राज्य
आत्महत्येविना येऊ दे
त्याला जगण्याचे बळ
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*