🌫 *नभ दाटता*🌧
काळे आकार घेऊन
नभ नभात दाटले
धरा चिंब करायला
मग इर्षेने पेटले
ढग ढगांशीच बोले
ढोल डमडम वाजे
कळ लागताच थोडी
माती पावसात भिजे
मेघ दाटता नभात
मोर पिसारा फुलवी
गाणी गाऊनी कोकीळा
वर्षा रूतुला बोलवी
वीज नाचे थयथया
लख्ख चमके नभात
धडाडम आवाजाने
धस्स होई काळजात
डोळे लावुनिया नभी
राजा शेतकरी स्तब्ध
येता मेघुट दाटूनी
त्याचे चिंब होती शब्द
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*