🏟 *गळाभेट*🔗
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
तुरूंगालाही म्हणे
पाझर आज फुटला
कैद्यांनीही मायेचा
ओलावा इथं लुटला
नको फक्त कारावास
हवा सुधारण्या वाव
मिळु द्या किनार्याला
डुंबण्या आधी नाव
झाली आपल्यांची भेट
किती आनंद वाटला
वाळवंटात मायेचा आज
कोमल अंकुर फुटला
बायका मुलांची यांच्या
म्हणे गळाभेट केली
डोळ्यांबरोबर तयांची
ह्रुदयही ओली झाली
झाल नसतं कृष्णकृत्य
तर आज इथं नसतो
सडलो नसतो तुरूंगात
घरी आनंदात असतो
हक्क पुन्हा सुधारण्याचा
प्रत्येकालाच आहे
म्हणूनच गळाभेटीचे इथं
प्रयोजन केलं आहे
आपराधी जरी असेल तो
तरी रक्ताच नात
भेटावया तयाला लेकीच
मन जेलात धावत
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*ldsawant.blogspot.in*