ठप्प संसद

🏟 *ठप्प संसद-अष्ठाक्षरी* 🏟

यांना म्हणे संसदेत
दिले जात नाही बोलू
म्हणून लोकांसमोर
मन लागलोय खोलू

देशभक्त नाहीत ते
नाही जे रांगेत उभे
ताटकाळून रांगेत
दुखू लागलेत खुबे

कोण म्हणे जरका मी
तोंड उघडले आता
भुकंप येईल मग
नाही मारत मी बाता

चालली नाही संसद
किती दिवसापासून
गंभीर प्रश्न लोकांचे
बसलेत आ वासून

संसद हात जोडून
आहे विनवित आज
जनतेच्या भल्यासाठी
चालु द्या रे कामकाज

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blgspot.in*