🌹 *काव्यांजलि* 🌹
👩🏽 *व्यक्तीरेखा-साळू*👼🏼
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
साळू एक गोंडस मुलगी
खुदकन गालात हसायची
रंग तिचा तेजस्वी सावळा
पोलक्यामधीच दिसायची
आई-बाबा दुष्काळात गेले
आजीसोबत ती रहायची
मोडक्या त्या झोपडीमधुन
भविष्याची स्वप्न पहायची
दोन वेळच्या जेवणासाठी
साळू मोल-मजुरी करायची
शिक्षण हेच वाघिणीचं दुध
कधीच ना ती विसरायची
अंधाराची भिती कधी नाही
त्याचीच तीला सोबती होता
विजेचा बल्ब कुठं नशीबात
कंधीलातच अभ्यास होता
कित्येक संकटांना तिने होते
जीवनात लिलया पार केले
यातुनच तीला कसे जगायचे
याचे बळ कि हो मिळून गेले
संकटांवर मात करीत असता
लोकसेवा परीक्षा पास झाली
झोपडीतील ती कष्टाळू साळू
लालदिव्याची मानकरी झाली
अशाच प्रकारे प्रत्येक साळूने
स्वतःला सज्ज केलेच पाहिजे
परिस्थितीवर मात करायला
स्वतःच आता शिकले पाहिजे
स्वतःच आता शिकले पाहिजे
*परिस्थितीवर मात करीत शिक्षण पुर्ण करून यशस्वी होणाऱ्या प्रत्येक साळूसाठी समर्पित*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
साळू
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment