प्रेम शोधताना

*प्रेम शोधताना*

प्रेमाच्या तुषारात तुझ्या
मी नाहलो नखशिखांत
श्रावणाच्या धारा झरझर
कधी त्याला नव्हता अंत

मोकळे ते केस मखमली
अवखळ चाळा करायचे
खांद्यावरती मान तुझी नि
श्वास श्वासामधी विरायचे

हातामधी हात गुंपुन किती
तुडविल्या मंतरलेल्या राती
भेटण्यासाठी आतुर हे मन
अन् धडधडणारी ती छाती

बहाणेही थकले होते सखे
रोजरोजचे ते खोटे बोलून
पायांनाही झालेली सवय
तुझ्या या घराकडे चालून

प्रेम म्हणजे? हे शोधताना
होतो प्रेमातच मी अडकलो
लाटांमध्ये लपेटलो गेलो
किनारी नाहीच धडकलो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*