लढ पोरी लढ

सायली ढमढेरे(वडील शिक्षक) ही पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारी विद्यार्थीनी,  मुंबई येथे परीक्षा देऊन येताना रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी झाले, ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये परिस्थितीवर मात करत आहे व मनात स्पर्धा परीक्षा पास होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या लढवैय्या सायलीसाठी

👍🏻 *लढ पोरी लढ*💐

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

अनंत लाटांचा सामना करत
नौका गाठतेच ना सांग कड
गड यशाचा गाठायचाय तुला
पोरी मागे हटायचं नाही लढ

एका पावसात वाहून गेल्यावर
चिमणी बनवतेच पुन्हा घर
हरवू देऊ नकोस मनाला तू
इवल्याशा त्या वादळावर

यश संपादन केलेच तिने
जरी झाला होता अपघात
नाचे मयुरी अनमोल झाली
करीत परिस्थितीवर मात

आई बाबा आणि मिञपरीवार
आहेत तुझ्या सोबती नेहमी
हरणार नाहीस तु मनात कधी
फक्त हीच आम्हाला हवी हमी

विसरायचे आहे सारे दुःख
पुन्हा जोमाने लढण्यासाठी
घेयचीय तुला उतुंग झेप
अवकाशाला जिंकण्यासाठी

लढायची तयारी ठेव तु फक्त
बघ सारं आसमंत खुणवतयं
यशाचे शिखर तुच चढावस
जणु तुलाच तेही विणवतयं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा,पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*