✍🏻 लक्ष्मण द.सावंत
निर्णय खरच छान आहे
जरा सोसून पाहिलं तर
काळोखात हरवलो असतो
असचं राहिलं असत तर
होत आहेत कष्ट जरी
उज्वल आहे भवितव्य
नकोच जायला बळी
पुन्हा एकदा एकलव्य
रांगेत उभे राहायची ही
सवय खरेतर नवी नाही
आत्ताच रांग मोडायची
का बरे लागलीय घाई?
सामान्य माणूस खूष आहे
नक्कीच बदल घडत आहे
काळ्याधनावरील नागोबा
सतत वळवळ करत आहे
संघर्षाशिवाय नाही भविष्य
इतिहास बघा सांगत आहे
नव्या दिशेनं घ्या चला झेप
संगत तुमची मागत आहे
गेलेत जरी बळी पन्नास
या लढाईत शहीद झाले
धनदांडग्यांना नाही वाली
दाबे चांगलेच दणाणले
नोटाबंदिला आपण सर्व
हसत हसत सामोरे जाऊ
एक भारत सशक्त भारत
हेच ब्रिद डोळ्याम्होरं ठेवू
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*
No comments:
Post a Comment