*उठा मुलांनो सज्ज व्हा रे*
उठा मुलांनो सज्ज व्हा रे
राष्ट्र रक्षणा तत्पर व्हा रे||धृ||
वैभवशाली हे राष्ट्र आपुले
विविधतेला एकीत गुंफले
रंगबिरंगी हे मोती- शिंपले
थोर परंपरा ही पुढेच न्या रे ||१||
जन्मदाञी ही कर्मविरांची
अन् मातृभुमी शुरविरांची
वाहते गंगा इथं मानवतेची
ध्यास प्रगतीचा मनी धरा रे ||२||
परआक्रमण इथं ना ठरले
लाख सिकंदर पुरून उरले
इंग्रजही आम्हा घाबरले
भुतकाळाला मनी जपा रे ||३||
कित्येक जाती धर्म कैक
रंग आगळे तरी ध्येय एक
देश हीत हेच कर्म नेक
वारसा हाच पुढे चालवा रे ||४||
सांगा कशाला हव्या जाती
होईल क्रांती जर हात हाती
परकियांचीही नसेल भिती
दिवा अज्ञानाचा मालवा रे ||५||
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blovspot.in*