पोशिंद्याची व्यथा

*पोशिंद्याची व्यथा*

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

आडत बाजारामधी
जाणवत आहे मंदी
भविष्यातील असेल
का ती उद्रेकाची नांदी

नोटा बंदीपासून आहे
शेतातील माल पडून
गळालेत पाय सुकलाय
पोशिंद्याचा गळा रडून

प्रत्येक हवामानात का
त्यालाच मार बसतोय?
तक्रार करणार कुणाकडं
मुकाट्याने सारे सोसतोय

लेकरावानी जपलेला सारा
माल लागलाय सडायला
तीळतीळ तुटतय काळीज
येतयं हमसून रडायला

अशा वेळी पोशिंद्याची
मदत करायलाच हवी
थोड्याशा आधारानेही
तो घेईल उभारी नवी

होणार आहे बदल म्हणून
तो ही विनाअट सोसणार
दगडानेच ठेच दिली तर
कोणत्या दगडाला कोसणार?

थोड्याशा मागणीसाठी
सारी दुनिया करते संप
शेतकरी संपावर गेला तर?
होईल अघटित धरणीकंप

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*

No comments: