⚖ *लोकशाही*⁉
लोकशाही का म्हणावे?
अजून कळळेच नाही
लोकशाहीसारखं इथं
खरतर काही घडत नाही
सामान्य लोक सत्तेवर
कधी बसलेत का सांगा
धनदांडग्याच्या हातातच
सत्तेच्या चावीचा धागा
अपराधी भ्रष्टाचार्याला
शिक्षा झालीय का कधी?
पिडीताला न्यायालयाचा
न्याय मिळाला का कधी?
इथं जो आहे बाहूबली
तोच ठरतोय शिरजोर
कष्ट करूनही पोशिंद्याच्या
जीवाला नेहमीच घोर
लोकशाहीत हक्काच मतही
राजरोज विकल जातयं
आंधळ दळतच राहतय
अन् कुञ पीठ खातयं
बलात्कार तर दररोजच
इथं लोकशाहीवर होतोय
न्यायदेवता अंधाळी तर
राजकर्ता धृतराष्ट्र बनतोय
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*