सावधान नगरसेवकांनो

👊🏻 *सावधान! नगरसेवकांनो*👊🏻

याचक असतात आधी ते
नाक रगडून मतं मागतात
निवडून आल्यावर मग
सोयीस्कर सर्व विसरतात

दिनवाणी चेहरा बघून
आम्हा दया होती आली
एकगट्टा सर्वांनी मिळून
आम्ही मतं त्यांना दिली

साधा आहेस नगरसेवक
रूबाबय राजाचा तुझा
काम वार्डात काही नाही
अन् पोस्टरचाच गाजावाजा

आत्ताच झाला नगरसेवक
मिरवाय लागलास तोरा
कामाचा नाही पत्ता काही
अन् विधानसभेचा व्होरा

अश्वासन पुर्ततेसाठी
नकार देतोस तु साफ
करुणाकर निष्ठुर असतो
करेल का रे तुला माफ

बांधलेले आहेत आता हात
निवडून दिलय आम्ही जरी
पाच वर्षानंतर लक्षात ठेवून
नक्कीच बसवू तुला घरी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*ldsawant.blogspot.in*
*१५/१२/१६---राञी ९.४५वा*