बालपणच गारठतय

*चार भिंतीत जग असणाऱ्या बालकाची बालदिनानिमित्त आईकडे मांडलेली व्यथा*
*बालपणच गारठतय*
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
तोच तो इडीयट बॉक्स
कार्टुन्स रटाळवाणी
चार भिंतीत माझ जग
खेळाया नाही कोणी
कधी लागेल अंगा माती
अन् बनवेल बैलजोडी
कार्टुन्स शिवायही माझे
असतील ना सवंगडी?
मलाही आई फूलपाखरांसवे
स्वच्छंद मुक्त जगायचय
मास्यांचे कल्ले लावून अंगा
पाण्यात खोल डुबायचय
किती जगू अभासी दुनियेत
शिरू दे कानात वारा
चिञात नको प्रत्यक्षातही
पाहू दे मोराचा पिसारा
तुच सांग शहाणं बाळ मी
होऊन जगू किती?
पिंजऱ्यातील जीवन माझं
बालपणाची झाली माती
संपलय ग समदं माझं
खेळण मनसोक्त
हसणं मनापासून आई
कधीच झालय लुप्त
सुटकेसाठी दावणीचं बघ
बछडं कस ओरडतय
सांगू कस आई चार भिंतीत
*बालपणच गारठतय*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com

No comments: