तु अशी

🌹 🌹

✍🏻 लक्ष्मण द.सावंत

मखमली केस तव
उडत्याती वार्यावर
अडकला हा जीव
चित्त नाही थार्यावर

हस ना जरा गाली
कळी कळी अतुर
सुगंध चहू बाजूला
झाल्या की फितुर

पायातलं ते पैजण
रूणझुण वाजती
मोरनी नाकातली
मजला खुणावती

चंद्राची ती चकोर
भाळी तव सजली
हळूच हसते गाली
सांग कुणा लाजली

नकोस राहू दूर अशी
मज पाशी तु हवी
नजरेत माझ्या तुझी
भरली आहे छवी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
hindhsher99@gmail.com

त्याला फक्त शिकवू द्या

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

पहिले कसा गुरूजींकडे
वेळच वेळ असायचा
दिसभर विद्यार्थ्यांबरोबर
तो रमताना दिसायचा

गमतीजमती शिकवताना
तो ही प्रसन्न असायचा
अशैक्षणिक कामाचा तेव्हा
अंगावर बोजा नसायचा

आता सरल शालार्थानी
त्याला पुरतं वेडलय
प्रगत माझ्या महाराष्ट्रात
अस भयानक घडलय

पेन्शन नाही, पगारामुळेही
घरात वाढू लागले खटके
तरूणपणातच गुरूजींना
आता येऊ लागले झटके

सेल्फी, अॉनलाईन कामात
गुरूजी झालेत दंग
रेंज शोधताना जीवनातील
उडून चाललेत रंग

विविध योजनांचा ढिगारा
अन् वाहू लागतोय पूर
अमलबजावणीत वेळ जातो
शिकवणे राहतय दूर

गुरूजी आहे ज्ञानदाता त्याला
गुरूजीच म्हणून राहू द्या
होईल कल्याण गरीब मुलांचे
त्याला फक्त शिकवू द्या
🙏🏻त्याला फक्त शिकवू द्या🙏🏻

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.केँ.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

ती मध्यराञ

जरा डोकावून पाहिल तर
एकही दंगल घडली नाही
जाळपोळ तर सोडनच द्या
एकही गाडी फोडली नाही

काळा पैसा हाच एकमेव
याच्या मागच कारण आहे
काळ्यापैसावाल्यांची आता
पाचा-वरती धारण आहे

संसदेत जरी गोंधळ झाला
सगळा देश रांगेमधी आहे
काळा पैसा स्वर्ग जरी
काट्यांची ती गादी आहे

इनामदारीने नित्य राहणारे 
झाले आहेत मनातून खूष
देशहीताला पोखरलेली ती
अचुक मारलेली आहे घुस

निर्णायाची ती मध्यराञही
मनातून सुखावली असेल
स्वतंत्र भारतात आता तरी
सामान्य जन आतुन हसेल

जरा सोसून पाहिले तर

✍🏻  लक्ष्मण द.सावंत

निर्णय खरच छान आहे
जरा सोसून पाहिलं तर
काळोखात हरवलो असतो
असचं राहिलं असत तर

होत आहेत कष्ट जरी
उज्वल आहे भवितव्य
नकोच जायला बळी
पुन्हा एकदा एकलव्य

रांगेत उभे राहायची ही
सवय खरेतर नवी नाही
आत्ताच रांग मोडायची
का बरे लागलीय घाई?

सामान्य माणूस खूष आहे
नक्कीच बदल घडत आहे
काळ्याधनावरील नागोबा
सतत वळवळ करत आहे

संघर्षाशिवाय नाही भविष्य
इतिहास बघा सांगत आहे
नव्या दिशेनं घ्या चला झेप
संगत तुमची मागत आहे

गेलेत जरी बळी पन्नास
या लढाईत शहीद झाले
धनदांडग्यांना नाही वाली
दाबे चांगलेच दणाणले

नोटाबंदिला आपण सर्व
हसत हसत सामोरे जाऊ
एक भारत सशक्त भारत
हेच ब्रिद डोळ्याम्होरं ठेवू

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*