*२५ नोव्हें. ते १० डिसें. हा जागतिक महिला हिंसाचारविरोधी पंधरवाडा साजरा केला जातो....त्यानिमित्ताने ही अष्टाक्षरी*👇🏻🙏🏻
विसाव्या शतकातही
नाहीच मिळाला न्याय
नौकरीत बरोबरी
तरी समानता नाय
गृहणींचे श्रममुल्य
मोजलेच नाही जात
विनाबोभाट राबते
चुपचाप ती घरात
घरकाम करायला
'श्री'ला वाटतेय लाज
पुरूषी अहंकाराचा
आहेच अजून माज
नौकरीला आहे तरी
राब राब ती राबते
मुलांसहीत त्याचाही
डबा तयार ठेवते
घरकामात मदत
नाही मिळत ही खंत
आता तरी वेदनेचा
जावा होऊन हा अंत
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*