तुला सोडून येताना

😢 *तुला सोडून येताना*😢

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तुला सोडून येताना
काळोखल्या होत्या दिशा
चांदण्यांची साथ जरी
एकांताने रडत होती निशा   

तुला सोडून येताना
होतो बेवफा मी जाहलो
किनाऱ्याला भुलूनी
निरर्थक वाहतच राहिलो  

तुला सोडून येताना
रवीही रडला होता
तुला नको दाह म्हणून
क्षितीजात दडला होता

तुला सोडून येताना
मला होते काटे बोचत
तुला मिळावा गुलाब
म्हणून होतो हसून सोसत

तुला सोडून येताना
होता थरारला हात
पडलं भोक काळजात
कसं वर्णु मी शब्दात

तुला सोडून येताना
आठवत आहे ती रात
आणाभाका खाल्लेल्या
तुला देणार होतो साथ

तुला सोडून येताना
वाटलं नव्यानं मी जगेण
नव्हतं वाटलं तुजविना
क्षणा क्षणाला मी मरेण

✍🏻  *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©hindhsher99@gmail.com*

अपघात

*रेल्वे अपघातावरून प्रभावित*

*अपघात*

✍🏻  *लक्ष्मण द.सावंत*

काळराञ म्हणावी
की काळी पहाट
एक तडा रूळाला
यमसदनाची वाट

कसा म्हणावं यास
सांगा अपघात
साखरझोपेत जणू
झाला हो घात

किती होती स्वप्ने
निजल्या डोळ्यात
छाटली ती कळी
फुलायच्या आत

रस्ता काय रेल्वेरूळ
वेळेवर करा दुरूस्त
नकोच ती टाळाटाळ
सरकार निद्रेत सुस्त

काटा रूतला माझ्या
काळजात खोल
जीव जीवाचा तुटला
मदत मातीमोल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*