🔪 *निरागसतेचा झालाय खून*
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
वाहून गेलय चिऊच घर
राहील्या फक्त आठवणी
शुष्क झाल्या बालगप्पा
हरवल्यात बडबडगाणी
वाढलय इथं कॉंक्रेटजंगल
संपलेत सारे मैदानी खेळ
प्राणवायुसाठी झाडानांही
हात पसरायची आली वेळ
मनातुन हसत नाही कोणी
सगळेच झालेत अॉनलाईन
उसणे हासु चेहऱ्यावरती
अन् बोलणं आय ॲम फाईन
तंत्रज्ञानाने जरी जग समदे
एकमेकांजवळ आलं
निरखून पाहा खरेतर सगळं
मनाने खुपच दुरावलं
आईचा तो भाऊ चांदोमामा
झालाय म्हणे आता मून
सुधारल्याच्या नावाखाली
निरागसतेचा झालाय खून
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©ldsawant.blogspot.in*