नोटसम्राट

💴 *नोटसम्राट* 💴
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
जमा करावं की न करावं
हा एकच प्रश्न....
की जगावं होऊन लाचार
घेऊन शंभर उसनं...
पाच पिढ्या बसून खातील
एवढी जमवली माया...
मातीमोल झालय आज
समदचं गेलं वाया...
का आताच विधात्यानं बर
एवढं कठोर वागावं....
क्षणार्धात एका सुंदर बागेचं
राखेत रूपांतर व्हावं....
काळाधनरूपी कर्कानं
मारला असा डंक..
एकाच राञीत रावाचा
होऊन बसलो रंक..
माझी अमाप होती संपत्ती
नव्हते काहीच कमी...
कशी करावी ती बँकेत जमा
सुचेना युक्ती नामी...
या पाचशे हजारांच्या नोटांचा
आता शेवट करावा...
की बँकेत जमा करून माया
दंड तिजोरीत भरावा...
काळापैसा सापडून आता
जेलशी होईल गाठ...
विसरून माणुसकी मी
झालतो *नोटसम्राट*....
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com

No comments: