भौमितिक आकार

*भौमितिक आकार*

असा आहे तो पाहा गोल
गोल फिरून जातो तोल
कळलेच नाही हो त्याला
गोलाचा वर्तुळ कसा झाला

ञिकोण पाहा जरा असा
तिन कोनांचा राजा जसा
कोन म्हणजे आहे कोण?
विचारू त्याला लावून फोन

चार कोन आणी चार बाजु
चला मिळून आपण मोजु
चौकोन कसे म्हणती त्याला
चला मिळून आपण खोजु

चार एकूण बाजू ह्याला
समोरील बाजू समान दोन
चार कोन याला आहेत तरी
नाही म्हणत याला चौकोन

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शिवकाव्य

*शिवजयंती विशेष काव्य*
*राजांना विनम्र अभिवादन करून या पुष्पांजली अर्पीत*

धसका घेतला मुघलांनी
होता थरथरला काळ
असा होता शुरवीर
माझ्या जीजाऊचा बाळ||धृ||

हाती भवानी मातेची
लखलखती तलवार
तिची पाहूनच धार
दुष्मनांनी घेतली माघार
जयघोष ज्याचा ऐकूनी
पेटून उठते रानमाळ||१||

प्रतापगडाच्या पायथ्याला
अफझलखान होता आला
माझ्या रयतेला त्याने
लय ञास होता दिला
वाघनख्या घालून त्याच्या पोटात
तोडली जीवनाची नाळ||२||

छञपती कुलावंतस
होता रयतेचा वाली
छायेखाली स्वाराज्याच्या
लोक सुखी होती झाली
निर्भयतेने जगत होती
परस्ञी आणि बाळ||३||

नजरेत तेज प्रखर
होता करारी बाणा
दिनदुबळ्यांचा वाली
तो रयतेचा राणा
तुका भजे त्याचे किर्तन
संगे वाजवूनी टाळ||४||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

घायाळ हरीणी

*चिञकाव्य-घायाळ हरीणी*

वेढा चहुबाजुंनी माझ्या
नजरेचा त्या दुर्जनांच्या
तुटून पडण्या टपलेल्या
टोळ्या त्या राक्षसांच्या

वार सोसते किती मी
नेहमीच दुष्ट यौवनांचे
घायाळ हरीणी वनी या
बांध फुटती आसवांचे

देहाला माझ्या झोंबती
फेडण्या कातडी लक्तरे
काळ्या नजरांनीच मेले मी
उरलेय हाडमांस फक्त रे

नाहीच कधी जमले
जगणे स्वच्छंदी देहाला
वारा स्वातंत्र्याचा कधी
नाहीच पिवून पाहिला

थकून गेले मी आता
प्रतिकार संपून गेला
घ्या घोट नरडीचा या
तुमच्या हवाली केला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

काव्यप्रेमी

*काव्यप्रेमी शिक्षक मंच*

ना ओळख कोणाची आहे
ना हार तुर्यांचा भार आहे
सगळेच परीवार समजतात
हाच ग्समुहाचा सार आहे

शिस्तबद्ध इथं डेली रूटिन
चुकलं तरी माफ आहे
नाहीच कोणाचा राग द्वेष
सगळ्याच ह्रुदय साफ आहे

दररोजच हजर राहा इथं
अस कोणतेही बंधन नाही
खरेतर दूर राहता येतच नाही
(सुवासिक हे)
असे दुसरे कुठेच चंदन नाही

रक्ताची नाती नाहीत गड्या
काव्याच्या धाग्यात गुंफलो आहोत
माय मराठीचा गौरव वाढविण्या
साहित्य गाडीला जुंपलो आहोत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नियतीचा खेळ

*नियतेचा खेळ*

कर्म करावया कधी
नाही काढलास वेळ
विसंबला भाग्यरेषेवर
म्हणे नियतेचा खेळ

हात जोडून देवाम्होरं
कधी भरते का पोट?
प्रयत्नाअंती प्रमेश्वर तरी
देवातच काढतो खोट

नको राहूस विसंबूनी
भाळावरल्या रेषेवर
पश्चात्ताप येतो पदरी
पडते पाणी आशेवर

नियतीचा हा खेळ
अजबच आहे प्यारे
स्वार्थापुरते असती सारे
किंवा तुटतही नाही तारे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

Love and Lover

Love is like a dinner
and lover is a dish
Abesbt of this dish
We everything Miss

My lover is my life
and also my valentine
makes My life happy
and day always fine

She enters in life
With awesome spring
Smiling face always
and hands of caring

Roses becoming red
and stars are shining
Wind caries happiness
With face of smiling

✍🏻 *LAXMAN SAWANT*
*ZPCPS PAL,AURNGABAD*
© *ldsawant.blogspot.in*