करा विचार लांबचा
तुम्ही मारा पाटीवर
नका पोटामधी मारू
नाही देता आला चारा
नका हो प्लास्टिक चारू
उभं आयुष्य शेतात
सारं झिजलय माझं
खाणं माझं कसं मग
तुम्हा वाटले हो ओझं?
जिथं तिथं प्लास्टिकचा
खच पडलेला आहे
मानवाचा विचारच
इथं सडलेला आहे
फळं तुमच्या कर्माची
आम्ही भोगीत बसतो
जरी तेहतीस कोट
देव देहात वसतो
असं प्लास्टिकच खाणं
नाही पोटाला पचलं
जगण्याचं बळ माझं
पूर्ण तिथच खचलं
छंद होतोय तुमचा
जीव जातोय आमचा
नका पाहू पायाजोगं
करा विचार लांबचा
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment