आजीबाई
काटी टेकवत आजी
होती माझ्याकडे आली
सुरकुतलेला हात
माझ्या फिरवला गाली
थराथरा कापे तिचे
बोलताना सारे अंग
नव्हतेच काळे केस
दिसे ढवळा हो रंग
एवढ्याशा बटव्यात
असे खजिनाच भारी
लगेचच उपचार
असो कोणीही आजारी
दात नव्हता एकही
तरी गोडगोड बोले
रोज गोष्ट सांगे नवी
जणू ओंजळीत फुले
अनुभव मात्र आहे
भरपूर तिच्याकडे
अशी आजीबाई छान
आहे बरं माझ्याकडे
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment