पोतराज
दार उघड बये तू
दारी पोतराज आला
थोडं धान्य दोन अंडी
वाढ सुपामधी त्याला
पोतराज तो आईचा
भटकतो दारोदारी
मळवट कुंकवाचा
लावियेला भाळेवरी
केला चिंद्याचा हासूड
वार अंगावर करी
चिंद्याचाच पोलका तो
बांधी आपल्या कमरी
दात लावून गाळ्याला
असा कोंबडा फाडीतो
समाजाच्या चालीरीती
पुढं जोमाने ओढीतो
केस लांबत राहीले
गेले दारिद्रय वाढत
येतं अंगामधी त्याच्या
भूत लोकांचं काढतं
हाती हलगी वाजते
चाळ घुंगराचा पायी
ठेव सुखात सकला
तुज विनवतो आई
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment