कांदा आणि टॕमोटोचे
घनघोर युद्ध झाले
चाकू विळी त्यांना मग
लढायला कामी आले
कोंथींबिर सुद्धा तिथं
आली धावत पळत
घाव तिलाही विळीचा
झाला कि हो नकळत
युद्ध सोडवताना ती
झाली काकडी शहीद
पातेल्याच्या तुरूंगात
थोडे दही झाले कैद
मिठानेही भांडणाला
थोडीफार हवा दिली
युद्धातच पातेल्यात
कोशिंबीर रेडी झाली
स्वाद असा शानदार
आले तोंडालाही पाणी
घेतो खाऊन आता मी
गेली संपून कहाणी
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment