*वेळ माझ्यासाठी*
ठेवा दूर मोबाईल
मला जवळ घ्या पप्पा
काढा वेळ माझ्यासाठी
मारू गोड गोड गप्पा
खेळे तुमच्या शेजारी
इवलासा माझा जीव
मोबाईलमुळे तुम्हा
तरी येत नाही कीव
सोडा ना हो मोबाईल
एक पापा मला द्या ना
एक फेरी मारायला
मला अंगणात न्या ना
अंगावर खेळेन मी
करा हाताचाही झुला
काढा रूसवाही माझा
मज बोलूनीया फुला
मला नकोत खेळणी
फक्त पप्पा मला हवे
बालपण माझे सारे
त्यांच्या सोबतीने जावे
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment