*कृष्ण*
यशोदेचा नंदलाला
राधिकेचा प्रिय सखा
यमुनेच्या तिरावर
खेळ रंगे हो अनोखा
खेळ चाले विटीदांडू
बालगोपाळांच्या संग
भान हरवूनी मिरा
होई भजनात दंग
जाती गोपिका हर्षुनी
जेव्हा वाजवी तो पावा
सुर मधुर असा की
वाटे ऐकत राहावा
लोणी चोरूनीया खातो
माठ दुधाचे फोडीतो
खोडी काढतो तो अशी
वेणी राधेची ओढीतो
केले कालियामर्दन
दृष्ट कंसही मारीला
भाऊ झाला द्रोपदीचा
मार्ग अर्जुना दाविला
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment