विडंबन

विडंबन

*रस्ता आणि खड्डे*

उगाच नको फासी खड्ड्यांना
त्यावर डांबर कशाला ओतता?
रस्ता म्हणून तरी जाणवू द्या
काय म्हणून लोलर मिरवता?

मजूर,कॉन्ट्रक्टर कित्येकांचे
पोट भरण्याचे साधन खड्डा
राहीलं साहीलं प्रतिनिधींचा
राजकारणाचा असतो अड्डा

सुधारणार कसा रस्ता जर
अर्धे तुम्ही खा, अर्धे आम्ही
कट्टर वैरी मग एका ताटात
खाण्यांर्याची ती युती नामी

दोष कुणाचा नाही कळत
लोकशाहीच चूकीची वाटते
विकासाची गाडी खरेतर
रस्त्यावरच अडकून पडते

चालत तोपर्यंत चालत असत
रस्त्यावरच डांबर फस्त होतं
उलटी गंगा वाहीली की
मग तोंडालाही फासल जात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

रानफूले

*रानफूले*🌸

रानातील रानफूले ही
काय कुणाची पर्वा
धग मनात जगण्याची
कुठला मग गारवा?

ऊन वारा पाऊसधारा
कुणाची आहे हिम्मत?
हरणे नाही माहित आम्हा
हीच जगण्याची गम्मत

मोती, शंख-शिंपले फळे
खायला शोधतो खेकडे
झाडावरी लोंबकळतो
की असतो आम्ही माकडे

तन पुरते नाही झाकलेले
तरी मन पुरते भरले आहे
प्रकृतीचे प्रत्येक नियम
ह्रुदयामधी कोरले आहे

हे क्षण का वाया घालावे
उगाच दुःख उगळत बसून
संकटांना दूर लाथाडून
बघतच बसावे खुशीत हसून

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

रानफूल


रानातील रानफूल मी
माझे मीच उमलले
आयुष्याचे भार माझे
माझे मीच पेलले

पाठीवरती दप्तर आणि
डोईवर सरपण भारा
आई बाबा थकलेले मग
मीच एकमेव सहारा

काळवंडलेला चेहरा
विद्येने मी चमकवणार
सावित्री लेक म्हणोणी
जगती आहे मिरवणार

फूलले जरी नाही मी
सुंदरश्या उबपवनात
परिस्थितीवर प्रत्येक
करणारच आहे मात

पोट उपाशी असले
तरी मन ज्ञानाने भरेल
भांभाळलेल्या पायांनी
वाट प्रगतीची धरेल

लक्ष्मण दशरथ सावंत

जगण्याचा चंग

*जगण्याचा चंग*

भेगाळली भूमी जरी
ह्रुदय एकसंघ आहे
नभाला गवसणी घालण्याचा
मनात एकच चंग आहे

पान्हा आटला आईचा जरी
ममत्व तीचे आटत नाही
कितीही भरारी मारली तरी
भूवरील पाय सूटत नाही

तिनेच दिलाय जन्म जीवांना
वृक्ष आणिक तरू लतांना
आधार दिलाय पशुपक्ष्यांना
मागेल त्या गरजवंताना

तुझ्याच कुशीत टेकवून पाठ
नभी लावलेले डोळे नि कान
ये रे धावून मेघराजा सत्वरी
धरती भिजण्याचे दे रे दान

उपाशी असे जरी पोट आमचे
नांगर मी चालविणार आहे
भेगाळलेल्या या भूमीत पुन्हा
भविष्य आजमिवणार आहे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मोफत आरोग्य शिबीर

मोफत आरोग्य शिबीर

निवडणूका येता जवळ
मतदारांची आठवण येते
विविध शिबिर आयोजून
हेल्थ चेकअप केले जाते

मोफत शरीर तपासणीचे
स्टॉल्सवर स्टॉल्स कैक
अनेक त्या प्रलोभनापैकी
हे ही गोंडस नावाचं एक

मतदारही माझा राजा
असतोय भारीच हुशार
वैद्यकीय खर्च परवडेना
करून घेतो फ्री उपचार

धावपळीच्या या युगामंधी
हे मनच आजारी पडतय
रक्तदाब, मधुमेह, स्वप्नभंग
आता प्रत्येकालाच जडतय

तनाचा नाही झाला तरी
मनाचा झाला पाहिजे उपचार  
पाच वर्षे छळणार्यांचा
घेतलाच पाहिजे समाचार

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

सहाक्षरी हुंडा बळी

बदललो जरी
कातडी हे गाञ
कैक दिवे जरी
काळी आहे राञ

शिकले असले
तरी मनी पाप
डोळ्यांचे करीती
बंद ते ही झाप

हुंड्याचा बळी ती
सदैव जातेय
उलटीच इथं
गंगा वाहतेय

देण घेण इथं
चालते लपून
आयत्या बिळात
नाग हा टपून

हुंड्यासाठी नका
छळू तुम्ही तीला
जन्माला घालते
तुमच्या वंशाला

हुंड्याचा हा काटा
नका तिला टोचू
कळीचा तो देठ
नका असा बोचू

कायद्याची भाषा
आता तरी जाणा
हुंडा बळीवर
टाच तुम्ही आणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हरवलेले गाव

*हरवलेले गाव*

नावापुरता गाव आता
ध्यानामधी असतोय
शहराच्या लागून नादी
गावपणा विसरतोय

लेझमाच्या तालावरती
साराच गाव नाचायचा
अशा प्रकारे बैलपोळा
माझ्या गावचा सजायचा

लेझमाची सर काही त्या
डीजे वाद्याला येईना
माणूसच नाही गावात
कोणीही आता नाचेना

पोटा-पाण्यापायी तरूण
सारे शहरामधी गेले
अधाराविना म्हातारे इथले
अनाथ आज झाले

हरवलेल्या कुंकवावानी
गाव माझा भासतोय
गजबलेलं माणूसपण नाही इथं
गाजरगवतचं माजतोय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

छंद तिला अनोखा

🌹 *छंद तिला अनोखा*

उडती वार्यावर केस मखमली
बटाही करती चाळे मऊ गाली
छळतो तो नाद रेशमी केसांचा
तिला छंद ना बटा आवरण्याचा

नजरेत सामावू पाहता लपून बसते
शोधताना तिला कधी ना सापडते
चंद्राचा तुकडा ढगाआड लपायचा
तिला छंदच नेहमीच हरवण्याचा

तिच्या एका नजरेने घायाळ होतो
मी माझ्यातुनच नाहीसा होतो
नाद मला तिच्या नजरेत सामावण्या
तिला छंद नेहमी नजरा चोरण्याचा

शब्द जसे माझ्या कानावर पडती
कर्णपटले ऐकण्या ते अतुर असती
नाद मज शब्दजळात अडकण्याचा
तिला छंद शब्दांनी भुलवण्याचा

मजला ती फुलपाखरू भासते
मी धरू पाहता दूर ती पळते
नाद मलाही तीलाच धरण्याचा
तिला छंद तो निसटून जाण्याचा 😥

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शरद पवार साहेब

*शरदराव पवार साहेब*
वाढदिवस विशेष अभिष्टचिंतन

जनतेचा जननायक
देशाचीही शान आहे
उज्वल कारकिर्द यांची
विदेशातही मान आहे

यशवंतरावांचा शिष्य
वारणेचा पाणी पिलाय
स्वतंत्र महाराष्ट्र माझा
अधुनेकतेकडे नेलाय

पुरोगामी असावे राष्ट्र
हाच विचार नित्य मनी
समानता स्थापल्याने
ही भुमी राहिल ञ्रुणी

साहेबांचा विषय येताच
मनी स्वाभीमान दाटतो
दिन दलीतांनाही साहेब
आपल्यातीलच वाटतो

आपला तो आपलाच होता
विरोधकही आपला मानला
राजकारणातला हा हीरा
सर्वांत सदैव अजोड गणला
                     क्रमशः
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.के.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सावधान नगरसेवकांनो

👊🏻 *सावधान! नगरसेवकांनो*👊🏻

याचक असतात आधी ते
नाक रगडून मतं मागतात
निवडून आल्यावर मग
सोयीस्कर सर्व विसरतात

दिनवाणी चेहरा बघून
आम्हा दया होती आली
एकगट्टा सर्वांनी मिळून
आम्ही मतं त्यांना दिली

साधा आहेस नगरसेवक
रूबाबय राजाचा तुझा
काम वार्डात काही नाही
अन् पोस्टरचाच गाजावाजा

आत्ताच झाला नगरसेवक
मिरवाय लागलास तोरा
कामाचा नाही पत्ता काही
अन् विधानसभेचा व्होरा

अश्वासन पुर्ततेसाठी
नकार देतोस तु साफ
करुणाकर निष्ठुर असतो
करेल का रे तुला माफ

बांधलेले आहेत आता हात
निवडून दिलय आम्ही जरी
पाच वर्षानंतर लक्षात ठेवून
नक्कीच बसवू तुला घरी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*ldsawant.blogspot.in*
*१५/१२/१६---राञी ९.४५वा*

सावधान नगरसेवकांनो

👊🏻 *सावधान! नगरसेवकांनो*👊🏻

याचक असतात आधी ते
नाक रगडून मतं मागतात
निवडून आल्यावर मग
सोयीस्कर सर्व विसरतात

दिनवाणी चेहरा बघून
आम्हा दया होती आली
एकगट्टा सर्वांनी मिळून
आम्ही मतं त्यांना दिली

साधा आहेस नगरसेवक
रूबाबय राजाचा तुझा
काम वार्डात काही नाही
अन् पोस्टरचाच गाजावाजा

आत्ताच झाला नगरसेवक
मिरवाय लागलास तोरा
कामाचा नाही पत्ता काही
अन् विधानसभेचा व्होरा

अश्वासन पुर्ततेसाठी
नकार देतोस तु साफ
करुणाकर निष्ठुर असतो
करेल का रे तुला माफ

बांधलेले आहेत आता हात
निवडून दिलय आम्ही जरी
पाच वर्षानंतर लक्षात ठेवून
नक्कीच बसवू तुला घरी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*ldsawant.blogspot.in*
*१५/१२/१६---राञी ९.४५वा*

अशी ती सुगरण

*अशी ती सुगरण*

हुश्शश्! या बायका भी
कमाल करतात राव
घेतात एकच वस्तु अन्
फिरवतात सारा गाव

अशा तिच्या वागण्याने
आमचा उडतो खटका
इतका ञास देऊन म्हणते
माझ्यामुळेच चालतोय संसार नेटका

हातपाय गळाले माझे
मागे फिरून फिरून
कल्पना करा काय झाले
असेल ते ओझं वाहून

नोटाबंदीने रांगेत थकलो
खरेदी करताना चालून
सुट्टे पैसेही संपवले सारे
तिने प्रेमळपणाने बोलून

एव्हढी खरेदी झाला तरी
तिचा गजरा राहिला होता
त्यासाठीचा कटाक्ष तिने
आगोदरच टाकला होता

उशीर झाला जरा म्हणून
कशाला स्वयंपाक करील
आवडीच्या हॉटेलमध्ये
जेवण्याचा आग्रह धरील

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शरद पवार साहेब

*शरदराव पवार साहेब*
वाढदिवस विशेष अभिष्टचिंतन

जनतेचा जननायक
देशाचीही शान आहे
उज्वल कारकिर्द यांची
विदेशातही मान आहे

यशवंतरावांचा शिष्य
वारणेचा पाणी पिलाय
स्वतंत्र महाराष्ट्र माझा
अधुनेकतेकडे नेलाय

पुरोगामी असावे राष्ट्र
हाच विचार नित्य मनी
समानता स्थापल्याने
ही भुमी राहिल ञ्रुणी

साहेबांचा विषय येताच
मनी स्वाभीमान दाटतो
दिन दलीतांनाही साहेब
आपल्यातीलच वाटतो

आपला तो आपलाच होता
विरोधकही आपला मानला
राजकारणातला हा हीरा
सर्वांत सदैव अजोड गणला
                     क्रमशः
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.के.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

ठप्प संसद

🏟 *ठप्प संसद-अष्ठाक्षरी* 🏟

यांना म्हणे संसदेत
दिले जात नाही बोलू
म्हणून लोकांसमोर
मन लागलोय खोलू

देशभक्त नाहीत ते
नाही जे रांगेत उभे
ताटकाळून रांगेत
दुखू लागलेत खुबे

कोण म्हणे जरका मी
तोंड उघडले आता
भुकंप येईल मग
नाही मारत मी बाता

चालली नाही संसद
किती दिवसापासून
गंभीर प्रश्न लोकांचे
बसलेत आ वासून

संसद हात जोडून
आहे विनवित आज
जनतेच्या भल्यासाठी
चालु द्या रे कामकाज

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blgspot.in*

समानता?

*२५ नोव्हें. ते १० डिसें. हा जागतिक महिला हिंसाचारविरोधी पंधरवाडा साजरा केला जातो....त्यानिमित्ताने ही अष्टाक्षरी*👇🏻🙏🏻

विसाव्या शतकातही
नाहीच मिळाला न्याय
नौकरीत बरोबरी
तरी समानता नाय

गृहणींचे श्रममुल्य
मोजलेच नाही जात
विनाबोभाट राबते
चुपचाप ती घरात

घरकाम करायला
'श्री'ला वाटतेय लाज
पुरूषी अहंकाराचा
आहेच अजून माज

नौकरीला आहे तरी
राब राब ती राबते
मुलांसहीत त्याचाही
डबा तयार ठेवते

घरकामात मदत
नाही मिळत ही खंत
आता तरी वेदनेचा
जावा होऊन हा अंत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

उठा मुलांनो सज्ज व्हा रे

*उठा मुलांनो सज्ज व्हा रे*

उठा मुलांनो सज्ज व्हा रे
राष्ट्र रक्षणा तत्पर व्हा रे||धृ||

वैभवशाली हे राष्ट्र आपुले
विविधतेला एकीत गुंफले
रंगबिरंगी हे मोती- शिंपले
थोर परंपरा ही पुढेच न्या रे ||१||

जन्मदाञी ही कर्मविरांची
अन् मातृभुमी शुरविरांची
वाहते गंगा इथं मानवतेची
ध्यास प्रगतीचा मनी धरा रे ||२||

परआक्रमण इथं ना ठरले
लाख सिकंदर पुरून उरले
इंग्रजही आम्हा घाबरले
भुतकाळाला मनी जपा रे ||३||

कित्येक जाती धर्म कैक
रंग आगळे तरी ध्येय एक 
देश हीत हेच कर्म नेक
वारसा हाच पुढे चालवा रे ||४||

सांगा कशाला हव्या जाती
होईल क्रांती जर हात हाती
परकियांचीही नसेल भिती
दिवा अज्ञानाचा मालवा रे ||५||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blovspot.in*

काय हवय बायकोला?

*काय हवय बायकोला?*

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

विचारात पडत पुरूषी मन
बायकोला हवं असत काय
सगळं काही पुरवल तरीही
तीच मन कधी भरतच नाय

माळला जरी नकळत गजरा
तरी तीचं मन खच खात
खुश असले जरी ह्रुदय तरी
मन संशयानेच जास्त घेरत

कधी होते चीडचीड तरी
सर्व काम वेळेवरच करते
रूसली जरी, काही क्षणच
रागही लवकरच आवरते

एक साडी घ्यायची तीला
पुर्ण दुकान खाली करते
एका मोरनीसाठी ती सारे
सुवर्णकार वेठीला धरते

कळले नाही अजून तीला
हवं आहे तरी नेमक काय?
कळलय म्हणणार्यांचे तरी
अजून मातीचेच आहेत पाय

सुखाचा मंञ ठेवा ध्यानी
तीचा निर्णय घेऊद्या तीला
उगी अडवणूक करून तीची
नका करून घेऊ स्क्रू ढिला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नियोजनशुन्य

💸 *नियोजनशुन्य*💸

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

नोटाबंदीनंतर आनंदल
आता खच खातय मन
निर्णय खरच क्रांतिकारी
पण नव्हतेच नियोजन

खरच बसलाय का धक्का
काळ्या पैसावाल्यांना?
तोंड दाबून बुक्यांचा मार
कोणीच काही बोलेना

पांढरेच पैसे सारे आमचे
बँकेत बसलेत अडकून
गेलेत हात पाय गळून
सतत ऐटीममधे धडकून

असून अडचण नसून खोळंबा
झाली दोन हजाराची नोट
खिशात असून पैसे सुद्धा
उपाशीच राहतय पोट

सुट्टे कुठेच मिळत नाही
वाढायला लागली दाढी
बायकोच वेगळच दुखण
मिळेल का तिला साडी 😥

दळणाबरोबरच किडाही
लागलाय भरडला जाऊ
पोटाला मिळाना खायला
देश डिजीटल होतोय पाहू

होतोय जरी ञास तरी
खुशीतच आहे जनता
सोसलं अजून थोड तर
देश होईनच महासत्ता

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

जीवं जीवस्य जीवनम्

*जीवं जीवस्य जीवनम्*

प्रत्येकाला हक्क जरी
वाटेल तसे वागण्याचा
जीवं जीवस्य जीवनम्
हा मंञ आहे जीवनाचा

इवल्याशा घासासाठी
किती चालवले हातपाय
शोधताना आपले भक्ष्य
जीवाचाही भरवसा नाय

पारडं अस हे नियतीचे
कस सांगावं कुठे झुकेल
प्राण घेताना दुसऱ्याचा
स्वतःच प्राणाला मुकेल

पावलोपावली आहे मरण
हे जरी अलिखित सत्य
संघर्ष करावाच लागतोय
इतभर पोटासाठी नित्य

नाही शाश्वती जीवाची
म्हणून रहावे नित्य दक्ष
काय सांगावं कधी कुठं
व्हावं लागणार भक्ष्य

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

स्मार्ट शाळा

*अष्ठाक्षरी-स्मार्ट शाळा*

ओढ शाळेतच घेई
किती आवरू मनाला
शाळाच माझे सर्वस्व
रजा हवीच कशाला

गंगा, सिंधू, सरस्वती
जशा नद्या भारताच्या
तशाच या विद्यार्थीनी
आहेत माझ्या वर्गाच्या

गप्प बसणारी राधा
वाचतीया धडाधडा
इंग्रजीत बोलूनिया
म्हणती प्रत्येक पाढा

करण्या प्रगत राष्ट्र
माझे बंधु राबत्याती
तहान भुक हरुनी
फरश्या रंगवत्याती

स्वखर्चाने प्रशिक्षण
तंत्रज्ञानाचे घेतले
ज्ञानबाग फुलविण्या
मनही त्यात ओतले

या स्मार्ट शिक्षणामुळे
छडी हातातील गेली
कृतीयुक्त शिक्षणाने
सारी मुलं आनंदली

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

ती चे बंड

👊🏻 *ती*चे बंड 🙎🏻

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

त्याच्या नावाचा टिळा
तीने कपाळवर गोंदला
त्याच्यासाठी दिनरात
जीव इस्तवापुढ रांधला

समाजात वावरताना ती
असते नेहमी लेडीजफर्स्ट
घरात असते पायपुसणी
काढते ती सगळ्यांच उष्ट

सगळ्या नंतरच झोपणार
अंथरूण सर्वांना ती गादी
नाहीच चिंता गार वार्याची
उठते ती सर्वांच्याच आदी

पडावं म्हटलं बाहेर तर
तीला आहे कुठं अक्कल
हाच फक्त ज्ञान सम्राट
सांगतय हे उघड टक्कल

रूढी परंपरेच्या नावानं
तीनच कुठवर खपायच?
त्याच्यातच हरवून स्वतःला
बाईपण कुठवर जपायच?

कधीपर्यंत सोसणार सर्व
कुठवर बसणार ती थंढ?
मनुवाद्यां विरोधात आता
तीला करावेच लागेल बंड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

लढ पोरी लढ

सायली ढमढेरे(वडील शिक्षक) ही पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारी विद्यार्थीनी,  मुंबई येथे परीक्षा देऊन येताना रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी झाले, ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये परिस्थितीवर मात करत आहे व मनात स्पर्धा परीक्षा पास होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या लढवैय्या सायलीसाठी

👍🏻 *लढ पोरी लढ*💐

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

अनंत लाटांचा सामना करत
नौका गाठतेच ना सांग कड
गड यशाचा गाठायचाय तुला
पोरी मागे हटायचं नाही लढ

एका पावसात वाहून गेल्यावर
चिमणी बनवतेच पुन्हा घर
हरवू देऊ नकोस मनाला तू
इवल्याशा त्या वादळावर

यश संपादन केलेच तिने
जरी झाला होता अपघात
नाचे मयुरी अनमोल झाली
करीत परिस्थितीवर मात

आई बाबा आणि मिञपरीवार
आहेत तुझ्या सोबती नेहमी
हरणार नाहीस तु मनात कधी
फक्त हीच आम्हाला हवी हमी

विसरायचे आहे सारे दुःख
पुन्हा जोमाने लढण्यासाठी
घेयचीय तुला उतुंग झेप
अवकाशाला जिंकण्यासाठी

लढायची तयारी ठेव तु फक्त
बघ सारं आसमंत खुणवतयं
यशाचे शिखर तुच चढावस
जणु तुलाच तेही विणवतयं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा,पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बालकविता

*बालकविता*

*प्राण्यांची ओळख मांजर*

मँव मँव करते
वाघाची मावशी
कामाला माञ
हाय लय आळशी

एक तीची सवय
आहे खूप छान
लपवून टाकते
स्वतःची घाण

तिला आवडते
पियाला दुध
झाकते डोळे
नसते सूद

मराठीत मांजर
इंग्रजीत कँट
आवडते तीला
खायला रँट

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तीच ती

*तीच ती*

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

वेलींच्या पानात
भ्रमरांच्या गाण्यात
सुंदर फुलात
फुलांच्या गंधात
तीच *ती*

सनईच्या सुरात
गाण्यातील शब्दांत
गझलेतील माञेत
कवितेतील ओळीत
तीच *ती*

प्रत्येक थेंबात
वाहणाऱ्या झर्यात
झुळझुळ पाण्यात
खळखळणार्या ओढ्यात
तीच *ती*

काळसर नभात
चांदेरी प्रकाशात
वाहणाऱ्या वार्यात
मंद मंद तारकात
तीच *ती*

माझ्या मनात
मखमली पानात
सळसळणार्या रक्तात
मनातल्या कप्प्यात
तीच *ती*

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

थांबायच नाही आता गड्या

*चलो औरंगाबाद १५ अॉक्टोंबर*
*थांबायच नाही आता गड्या*
थांबायच नाही आता गड्या
पुढतीच आहे तुला जायचे
हक्क मिळाल्याबिना आपुला
मागे कधीच नाही परतायचे
घेण्या ती पेन्शन हिसकावून
संघटित आपण चला होऊ
जे आले, लढले आणि संपले
न्याय त्यांनाही मिळवून देऊ
स्वार्थी राजकारणी आनंदात
मिळवून घेतली की हो पेन्शन
आम्ही राबराब राबतो जन्मभर
घेऊन उतार वयातील टेंन्शन
म्हणूनच सांगण तुला जागा हो
जुन्या पेन्शनचा आता धागा हो
मिळविण्या आपला हक्क आपण
झटकून कामाला आता लागा हो
नागपूर असो वा आझाद मैदान
ही तर फक्त झाँकी आहे
यश खूप दूर नाही रे आपुल्या
एकच एल्गार आता बाकी आहे
✍🏻 *लक्ष्मण द. सावंत*
*प्रा.शि.औरंगाबाद*
*एक डी.सी.पी.एस.ग्रस्त*

सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या

*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*🍀
सीमा ओलांडा रे मानवतेच्या
आणिक ओलांडा समतेच्या
नाव कमवण्या जीवनात या
सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या
बळी जाते *ती* बलात्काराच्या
वाढल्या घटना बहु दुष्कर्माच्या
छाटा चला रे मुंडकी रावणाच्या
*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*
शहीद जवान रक्षणा सीमेच्या
शेतकरी ही प्रतिक्षेत भावाच्या
नेते लुटत्यात तिजोरी देशाच्या
नको जावू आहारी भावनेच्या
दीनांचा कैवारी आता तु व्हावे
उज्वल भारताचे स्वप्न दाखवावे
संगती नको आता दुर्जणाच्या
*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*
उद्याची पहाट रे तुझ्याचसाठी
आणि दीनांच्या कल्याणासाठी
माझ्याही आहेत पाठी शुभेच्छा
*सीमा ओलांडा रे कर्तृत्वाच्या*
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल.औरंगाबाद*

मंगलमयी दिवाळी आली

💥 *मंगलमयी दिवाळी आली*🎊
✍🏻 *श्री.लक्ष्मण द.सावंत*
मंगलमयी दिवाळी आली
ज्ञान प्रकाशाचे दिवे लावा
ज्ञान सुगंध पसरवेल जगी
असे तोरण दाराला लावा
दुष्ट जळमटे घराची काढा
प्रेमाचे रंग तयाला लावा
रागरोष जुने विसरून ते
मांगल्याचा पेटवा दिवा
प्रात; समयी लवकर उठूनी
आळस मनातून फेकून द्या
अत्तर सुगंधी उटने लावूनी
ताईच्या हाताने न्हावून घ्या
संस्काराची रांगोळी दारात
गोड फराळाची चव पाहा
थोडस तिखटही हवेच न
धपाटे चिवडाही मजेत खा
दिवाळी सन खरचय मोठा
आनंदालाही नाहीय तोटा
आपल्यासवे अनाथांच्याही
दोन-चार घास भरवू पोटा
दिवाळी कधीच निरस नाही
आपणच निरस होत चाललो
वास्तवाला विसरत जाऊन
मोहजालाला पाहून भुललो
✍🏻 *श्री.लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
📱 *9403682125*

फटाके वाजवणे टाळा

आजच्या औरंगाबाद येथील आग्नितांडव व फटाक्यामुळे झालेले नुकसान खूपच भयानक होते..शाळेला सुट्टी लागताना आम्ही सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रदुषणमुक्त व फटाकेमुक्त दिवाळी पथनाट्य सादर केलेले किती समर्पक होते याचा प्रत्यय आला.म्हणुनच आजचे हे काव्य* 👇🏻
आनंदात विरजण हे
आज पडले काहीसे
आताच कसे होत्याचे
झाले क्षणात नाहीसे
क्षणाची ती रोषणाई
काय सांगा कामाची
वाहून कष्टे जाणार
माती मोल घामाची
असे हे अग्नितांडव
सुखी स्वप्न बेचिराख
पैसाचा चुराडा झाला
मालमत्ता इथं खाक
किती पक्षी जायबंदी
किती किती प्रदुषण
कोण सांगणार किती
झाले असेल नुकसान
सावध व्हा आतातरी
ऐका पुढल्या हाका
प्रदुषण करणाऱ्याला
चला आतातरी रोखा
म्हणुनच प्रदुषणावर
घातला पाहीजे आळा
का ओढवाता संकटे
फटाके वाजवणे टाळा
🙏🏻फटाके वाजविणे टाळा 🙏🏻
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

दिवा ज्ञानाचा

*सर्व शिक्षक बंधु- भगिनींना समर्पित*
🌹 *काव्यांजलि* 🌹
💥 *दिवा ज्ञानाचा* 💥
✍🏻 *लक्ष्मण द. सावंत*
लावला दिवा, दिवा ज्ञानाचा प्रकाशला
अज्ञानरूपी अंधकार, कायमचा संपला
ज्ञानरचनावाद ,साथीला सदैव आमुच्या
तंत्रज्ञानालाही ज्ञान माळेत आहे गुंपला
विचार मनात एक,प्रगत महाराष्ट्र माझा
शिक्षक बंधु म्हणुनच या कामात गुंपला
लोकवर्गीनीने शाळा, डिजीटल झाल्या
स्वखर्च करण्यासही जीव कधी न कंपला
वाटते चिमुकल्यांनी या, बहूआयमी बनावे
त्याच्यातच शिक्षक हा नित्य आहे जुंपला
आदेश नको आम्हा, प्रेमळ साद माञ हवी
कारवाईचा तुम्ही, झाकून टाका ना शिंपला
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद