बदललो जरी
कातडी हे गाञ
कैक दिवे जरी
काळी आहे राञ
शिकले असले
तरी मनी पाप
डोळ्यांचे करीती
बंद ते ही झाप
हुंड्याचा बळी ती
सदैव जातेय
उलटीच इथं
गंगा वाहतेय
देण घेण इथं
चालते लपून
आयत्या बिळात
नाग हा टपून
हुंड्यासाठी नका
छळू तुम्ही तीला
जन्माला घालते
तुमच्या वंशाला
हुंड्याचा हा काटा
नका तिला टोचू
कळीचा तो देठ
नका असा बोचू
कायद्याची भाषा
आता तरी जाणा
हुंडा बळीवर
टाच तुम्ही आणा
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment