ती चे बंड

👊🏻 *ती*चे बंड 🙎🏻

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

त्याच्या नावाचा टिळा
तीने कपाळवर गोंदला
त्याच्यासाठी दिनरात
जीव इस्तवापुढ रांधला

समाजात वावरताना ती
असते नेहमी लेडीजफर्स्ट
घरात असते पायपुसणी
काढते ती सगळ्यांच उष्ट

सगळ्या नंतरच झोपणार
अंथरूण सर्वांना ती गादी
नाहीच चिंता गार वार्याची
उठते ती सर्वांच्याच आदी

पडावं म्हटलं बाहेर तर
तीला आहे कुठं अक्कल
हाच फक्त ज्ञान सम्राट
सांगतय हे उघड टक्कल

रूढी परंपरेच्या नावानं
तीनच कुठवर खपायच?
त्याच्यातच हरवून स्वतःला
बाईपण कुठवर जपायच?

कधीपर्यंत सोसणार सर्व
कुठवर बसणार ती थंढ?
मनुवाद्यां विरोधात आता
तीला करावेच लागेल बंड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: