रानफूल


रानातील रानफूल मी
माझे मीच उमलले
आयुष्याचे भार माझे
माझे मीच पेलले

पाठीवरती दप्तर आणि
डोईवर सरपण भारा
आई बाबा थकलेले मग
मीच एकमेव सहारा

काळवंडलेला चेहरा
विद्येने मी चमकवणार
सावित्री लेक म्हणोणी
जगती आहे मिरवणार

फूलले जरी नाही मी
सुंदरश्या उबपवनात
परिस्थितीवर प्रत्येक
करणारच आहे मात

पोट उपाशी असले
तरी मन ज्ञानाने भरेल
भांभाळलेल्या पायांनी
वाट प्रगतीची धरेल

लक्ष्मण दशरथ सावंत

No comments: