हरवलेले गाव

*हरवलेले गाव*

नावापुरता गाव आता
ध्यानामधी असतोय
शहराच्या लागून नादी
गावपणा विसरतोय

लेझमाच्या तालावरती
साराच गाव नाचायचा
अशा प्रकारे बैलपोळा
माझ्या गावचा सजायचा

लेझमाची सर काही त्या
डीजे वाद्याला येईना
माणूसच नाही गावात
कोणीही आता नाचेना

पोटा-पाण्यापायी तरूण
सारे शहरामधी गेले
अधाराविना म्हातारे इथले
अनाथ आज झाले

हरवलेल्या कुंकवावानी
गाव माझा भासतोय
गजबलेलं माणूसपण नाही इथं
गाजरगवतचं माजतोय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: