*जगण्याचा चंग*
भेगाळली भूमी जरी
ह्रुदय एकसंघ आहे
नभाला गवसणी घालण्याचा
मनात एकच चंग आहे
पान्हा आटला आईचा जरी
ममत्व तीचे आटत नाही
कितीही भरारी मारली तरी
भूवरील पाय सूटत नाही
तिनेच दिलाय जन्म जीवांना
वृक्ष आणिक तरू लतांना
आधार दिलाय पशुपक्ष्यांना
मागेल त्या गरजवंताना
तुझ्याच कुशीत टेकवून पाठ
नभी लावलेले डोळे नि कान
ये रे धावून मेघराजा सत्वरी
धरती भिजण्याचे दे रे दान
उपाशी असे जरी पोट आमचे
नांगर मी चालविणार आहे
भेगाळलेल्या या भूमीत पुन्हा
भविष्य आजमिवणार आहे
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment