अशी ती सुगरण

*अशी ती सुगरण*

हुश्शश्! या बायका भी
कमाल करतात राव
घेतात एकच वस्तु अन्
फिरवतात सारा गाव

अशा तिच्या वागण्याने
आमचा उडतो खटका
इतका ञास देऊन म्हणते
माझ्यामुळेच चालतोय संसार नेटका

हातपाय गळाले माझे
मागे फिरून फिरून
कल्पना करा काय झाले
असेल ते ओझं वाहून

नोटाबंदीने रांगेत थकलो
खरेदी करताना चालून
सुट्टे पैसेही संपवले सारे
तिने प्रेमळपणाने बोलून

एव्हढी खरेदी झाला तरी
तिचा गजरा राहिला होता
त्यासाठीचा कटाक्ष तिने
आगोदरच टाकला होता

उशीर झाला जरा म्हणून
कशाला स्वयंपाक करील
आवडीच्या हॉटेलमध्ये
जेवण्याचा आग्रह धरील

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: