मोफत आरोग्य शिबीर
निवडणूका येता जवळ
मतदारांची आठवण येते
विविध शिबिर आयोजून
हेल्थ चेकअप केले जाते
मोफत शरीर तपासणीचे
स्टॉल्सवर स्टॉल्स कैक
अनेक त्या प्रलोभनापैकी
हे ही गोंडस नावाचं एक
मतदारही माझा राजा
असतोय भारीच हुशार
वैद्यकीय खर्च परवडेना
करून घेतो फ्री उपचार
धावपळीच्या या युगामंधी
हे मनच आजारी पडतय
रक्तदाब, मधुमेह, स्वप्नभंग
आता प्रत्येकालाच जडतय
तनाचा नाही झाला तरी
मनाचा झाला पाहिजे उपचार
पाच वर्षे छळणार्यांचा
घेतलाच पाहिजे समाचार
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment