*अष्ठाक्षरी-स्मार्ट शाळा*
ओढ शाळेतच घेई
किती आवरू मनाला
शाळाच माझे सर्वस्व
रजा हवीच कशाला
गंगा, सिंधू, सरस्वती
जशा नद्या भारताच्या
तशाच या विद्यार्थीनी
आहेत माझ्या वर्गाच्या
गप्प बसणारी राधा
वाचतीया धडाधडा
इंग्रजीत बोलूनिया
म्हणती प्रत्येक पाढा
करण्या प्रगत राष्ट्र
माझे बंधु राबत्याती
तहान भुक हरुनी
फरश्या रंगवत्याती
स्वखर्चाने प्रशिक्षण
तंत्रज्ञानाचे घेतले
ज्ञानबाग फुलविण्या
मनही त्यात ओतले
या स्मार्ट शिक्षणामुळे
छडी हातातील गेली
कृतीयुक्त शिक्षणाने
सारी मुलं आनंदली
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment