*रानफूले*🌸
रानातील रानफूले ही
काय कुणाची पर्वा
धग मनात जगण्याची
कुठला मग गारवा?
ऊन वारा पाऊसधारा
कुणाची आहे हिम्मत?
हरणे नाही माहित आम्हा
हीच जगण्याची गम्मत
मोती, शंख-शिंपले फळे
खायला शोधतो खेकडे
झाडावरी लोंबकळतो
की असतो आम्ही माकडे
तन पुरते नाही झाकलेले
तरी मन पुरते भरले आहे
प्रकृतीचे प्रत्येक नियम
ह्रुदयामधी कोरले आहे
हे क्षण का वाया घालावे
उगाच दुःख उगळत बसून
संकटांना दूर लाथाडून
बघतच बसावे खुशीत हसून
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment