गर्द हिरव्या पानात
गर्द हिरव्या पानात
आंबा पाडाचा पाहून
चोच मारायला जोडी
येते राघूंची धावून
गर्द हिरव्या पानात
जोडी हिरवी रावाची
लालेलाल चोचीने ते
रस चाखती कवाची
गर्द हिरव्या पानात
आंबे लपलेले जणू
रस चाखताना राघू
लागे गीत गुणगुणू
गर्द हिरव्या पानात
येई कवडसे छान
खेळ ऊन सावलीचा
जरा हालताच पान
गर्द हिरव्या पानात
किती चैतन्य दिसते
वसंताच्या चाहूलीने
सृष्टी आनंदे हसते
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment