लाखात एक
तिव्र उन्हाळ्याच्या झळा
पोळू लागल्या अंगाला
माथी मारली गरिबी
नाही देव तो चांगला
देह उगडाच माझा
रानी चारताना शेळी
जीव इवलासा जरी
आहे दैवाचीच खेळी
दोन्ही टेकले गुडघे
पाणी घ्यावया मुखात
माझे प्रतिबिंब तिथे
एक दिसते लाखात
पाणी हे जलाशयाचे
मज भासते नितळ
मिटे तहान जीवाची
जरी असेल उथळ
झाले शरीर काटक
राना- वनात राहून
काळासवे पाण्यासम
जावे दुःखही वाहून
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment