रात्रं - दिवस जवान
आहे सीमेवर उभा
त्यांच्या संरक्षणामुळे
आम्हा स्वातंत्र्याची मुभा
आई बाप ताई बंधू
पत्नी मुलगा मुलगी
सोडूनिया सगळ्यांना
केली सीमेशी सलगी
किती असेल ते प्रेम
भारताच्या मातीवर
गोळ्या शत्रुंच्या तैयार
झेलायला छातीवर
जवानांचे बलीदान
व्यर्थ नकोच जायला
वर्षे अनेक लागती
वीरव्यक्ती जन्मायला
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment