*मला शाळेला जायचं*
आई कर जरा घाई
मला शाळेला जायचं
गेल्या संपुनिया सुट्या
नाही घरला राहाचं
शोभुनिया दिसतयं
बघ दप्तर चिमिचं
नविनचं वाटतया
बघ पुस्तक नमीचं
माझ्या वर्गातील पोरं
जमा झाली असतील
खेळ गप्पा रंगवता
हळू गाली हसतील
रोज जाईन शाळेत
रोज अभ्यास करीन
सारूनिया काजळीला
वाट ज्ञानाची धरीन
नको ठेवू मला घरी
आता शाळेत जाऊ दे
आणि शिक्षण घेवूनी
मला साहेब होऊ दे
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment