*बदलाची नांदी*
कात टाकली शाळेने
बदलला गणवेश
डिजीटल शिक्षणाने
अंगी बानविला जोश
गेली बदलून शाळा
बदलले गुरूजण
काय हवे विद्यार्थ्यांना
त्यांनी जाणलेय मन
अ आ ई गिरवणा-या
हाती आलाय माऊस
सेमी इंग्रजीच्या संगे
घर झालय हाऊस
गेली हातातली छडी
झाली भयमुक्त शाळा
तंत्रज्ञानी शिक्षणाचा
लागे विद्यार्थ्यांना लळा
झाली डिजीटल शाळा
बोलु लागले पुस्तक
नव्या शिक्षणाची नांदी
गेली देऊन दस्तक
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment