*सुंदर आयुष्य*
एवढ्याशा कारणाने
नाही निराश व्हायचं
भले येऊ दे संकटे
नित्य हासत राह्यचं
क्षण कसोटीचा सदा
घेतो परीक्षा आपली
तोच यशस्वी जगतो
ज्याने शांतता जपली
येती कित्येक वादळे
घोंगावत नैराश्याची
आणि घेतात परीक्षा
मनातल्या संयामाची
फास लावून गळ्याला
प्रश्न संपलेत कुठे?
फुले हसत फुलती
जरी टोचतात काटे
किती सुंदर आयुष्य!
वाया नकोस घालवू
अनमोल देहावर
नको उदार तू होऊ
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment