*माझी माय मराठी*
माझी माय मराठी
तिचा अविट गोडवा
सुरूवात वर्षाची
जिचा करतो पाडवा
माझी माय मराठी
ज्ञाना गोडवे गातो
सह्याद्रीचा वारा जिच्या
अंगाखांद्यावर खेळतो
माझी माय मराठी
काळी कणखर माती
नसानसात मराठी अन्
अतुट इथली नाती
माझी माय मराठी
तिची थोर महती
बहिणाबाई ओवीतूनी
तिची गाणी गाती
माझी माय मराठी
मुखामुखात वसते
दिनरात मराठीजण
शेताशेतातूनी कसते
माझी माय मराठी
बोबड्या बोलात रांगते
व्हावे समृद्ध ज्ञानी
अजूनी काही ना मागते
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment